
Beed News : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून झाला. या घटनेबरोबर दुसरीकडे परळीतील एका युवा व्यापाऱ्याचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालं. या दोन्ही घटनांनी बीड जिल्हा हादरला आहे.
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करताना भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. या दोन्ही घटनांच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
बीडच्या मस्साजोग गावाच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा आणि परळीतील युवा व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून लुटमार केली. हे गंभीर गुन्हे आहेत. बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास पथकामार्फत व्हावा. विशेष यंत्रणा यासाठी नेमावी, अशी मागणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात गुन्ह्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. गुन्हेगारीमुळे सामाजिक चिंता वाढली आहे. अपहरण, वाळू माफिया, गोळीबार, खून अशा घटनांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय ठरत आहे. गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी (Police) त्यांची यंत्रणा राबवावी. अवैध धंद्यावर वचक बसवावा. प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास करावा, अशा घटना घडण्यापूर्वी काही उपाययोजना करता येतात का? याकडे लक्ष द्यावे. अशा सर्व मुद्यांवर घेऊन सीएम फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरणानंतर हत्या झाली. त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला. याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. मस्साजोग गावकरी रस्त्यावर उतरले. रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांच्या या आंदोलनात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचे सांत्वन केले.
दरम्यान, सरपंच देशमुख यांच्या हत्येतील मास्टर माईंड शोधून ठोस कारवाई करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे, रजनी पाटील, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा यांनी केली आहे. केज पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालण्यासाठी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी काल आंदोलनादरम्यान केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.