Sattar-Danve-Karad Sarkarnama
मराठवाडा

भाजपचे केंद्रातले दोन मंत्री आले, तरी शिवसेनेचा भगवा फडकवलाच

आमचे सहा उमेदवार हे अवघ्या २-३ मतांनी पराभूत झाले, अन्यथा आम्ही भाजपाला इथे खातेही उघडू दिले नसते. (Abdul Sattar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघातील सोयगांव नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवत भगवा फडकवला. (Shivsena) १७ पैकी ११ जागा जिंकत सत्तार यांनी ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यातून घेतली. (Abdul Sattar) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या लोकसभा मतदारसंघातील ही नगरपंचायत असल्याने इथे भाजपने जोर लावला होता.

केंद्रातील दोन राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड, रावसाहेब दानवे सोयगांवात प्रचारासाठी आले होते. पण मतदारांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भरभरून मतदान केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा हा विजय असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

सोयगांव नगरपंचायतीवर भगवा फडकवल्यानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले, तसेच दिलेल्या सर्व आश्वासनांची पुर्तता करणे हेच आपले आता काम असेल असेही जाहीर केले. अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. म्हणूनच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड सोयगावमध्ये प्रचाराला येऊन गेले. पण मतदार त्यांच्या भूलथापांना बळी पडले नाही.

आमचे सहा उमेदवार हे अवघ्या २-३ मतांनी पराभूत झाले, अन्यथा आम्ही भाजपाला इथे खातेही उघडू दिले नसते. हा विजय विश्वासाच , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आहे. सोयगावला लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजना मिळवून देणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्याचे दिलेले आश्वासन लवकरच पुर्ण करणार असल्याचे सत्तार म्हणाले.

शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विकास साधून सोयगावला नवे रूप देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगर पंचायतची एकमेव निवडणूक होती. रावसाहेब दानवे, भागवत कराड यांनी जोरदार प्रयत्न करून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदार बांधवांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT