नांदेड जिल्ह्यात चव्हाणांचाच बोलबाला; काॅंग्रेसने ५१ पैकी ३३ जागा जिंकल्या

नायगाव नगर पंचायतीमध्ये १७ पैकी १७ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. गेल्यावेळी इथे काॅंग्रेसला १३ जागा होत्या. ( Ashok Chavan)
Guardian Minister Ashok Chavan
Guardian Minister Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.( Congress) नगरपंचायतीच्या एकूण ५१ जागांपैकी तब्बल ३३ जागा काॅंग्रेसने जिंकल्या आहेत. (Ashok Chavan) तर भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. (Nanded) काही ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादीला माफक यश मिळाले आहे.

जिल्ह्यात नायगाव, अर्धापूर आणि महापूर या तीन नगरपंचायतीसाठी मतदान झाले होते. आज मतमोजणीनंतर नायगांव आणि अर्धापूर नगरपंचायतीत काॅंग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले. तर माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली आहे.

नायगाव नगर पंचायतीमध्ये १७ पैकी १७ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. गेल्यावेळी इथे काॅंग्रेसला १३ जागा होत्या, यावेळी त्यात चारची वाढ झाली आहे.

अर्धापूर नगर पंचायत देखील १७ पैकी १० जागा जिंकत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. गेल्या वेळी इथे काँग्रेसला दहा जागा होत्या.

माहूर नगर पंचायतीत मात्र काॅंग्रेसला धक्का बसला. १७ पैकी काँग्रेसला इथे ६ जागांवर विजय मिळवता आला. गेल्यावेळी इथे पक्षाला फक्त तीन जागा होत्या. तीन जागा वाढल्या असल्या तरी सत्ता मिळवण्यात काॅंग्रेसला इथे यश मिळालेले नाही.

Guardian Minister Ashok Chavan
घनदाटांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पालम नगरपंचायतीत मिळाली सत्ता; भाजप पराभूत

इथे राष्ट्रवादीला ७ तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत. भाजपचा मात्र नांदेड जिल्ह्यात धुव्वा उडाला आहे. माहूरला १ व अर्धापूरला २ अशा जिल्ह्यात फक्त ३ जागा भाजपला जिंकता आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com