Ajit Pawar-Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : अजित पवारांनी लाडक्या मुंडेंना दिली निम्म्या मराठवाड्याची `सुभेदारी`..

Beed Political News : जिल्ह्यातील चार पैकी तीन आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेले असताना देखील पवारांची सभा मोठी झाली.

सरकारनामा ब्युरो

Marathwada Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या लाडक्या धनंजय मुंडे यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी दिली आहे. (Ajit Pawar-Dhananjay Munde ) मंत्री म्हणून अजित पवार गटाने संघटना बांधणीच्या जबादारीचे वाटप केले आहे. त्यात मुंडे यांच्याकडे मराठवाड्यातील निम्म्या जिल्ह्यातील सुभेदारी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये जाहीर सभा घेतली.

बंडानंतरची मराठवाड्यातील ही सभा रेकाॅर्डब्रेक झाली. या सभेचा धसका (Ajit Pawar) अजित पवार गटाने घेतल्याची चर्चा असतांनाच संघटना बांधणीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात काल आदेश दिले आहेत. अजित पवार यांच्या बंडाला (Marathwada) मराठवाड्यातून भक्कम साथ मिळाली आहे. हे लक्षात घेता या भागात मजबूतीने पाय रोवण्यासाठी अजित पवारांनी विशेष लक्ष दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आणि अजित पवारांचे लाडके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर मराठवाड्यातील ८ पैकी चार जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यात बीडसह परभणी, नांदेड आणि जालना या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचे उदिष्ट मुंडे यांना देण्यात आले आहे. शरद पवार यांच्या बीडमधील सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील चार पैकी तीन आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेले असताना देखील पवारांची सभा मोठी झाली. या सभेत शरद पवारांनी मुंडे, अजित पवार यांच्यावर थेट नाव घेऊन टीका केली नसली तरी सभेला आलेल्या लोकांना द्यायचा तो संदेश दिलाच. या सभेचा धसका घेतच येत्या २७ रोजी बीडमध्ये त्याच ठिकाणी अजित पवार हे उत्तर सभा घेऊन प्रत्युत्तर देणार असल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्यावर निम्म्या मराठवाड्यातील जबाबदारी सोपवत अजित पवारांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे यांचा बीडसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय त्यांच्या भाषणाचा एक मोठा चाहता वर्ग लक्षात घेता अजित पवारांनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT