Santosh Bangar Viral video : शिंदे गटाच्या आमदाराची अधिकाऱ्याला पुन्हा धमकी : ‘...तर तुम्हाला पायाखाली तुडविल’

MLA Santosh Bangar : सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कायम धारेवर धरणाऱ्या शिंदे गटाचे हिंगोलीचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर एका व्हिडीओमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
Santosh Bangar Viral video :
Santosh Bangar Viral video :Sarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कायम धारेवर धरणाऱ्या शिंदे गटाचे हिंगोलीचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर एका व्हिडीओमुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विद्यार्थिनींना बस वेळेत का मिळत नाही, याचा जाब विचारत त्यांनी कळमनुरी एसटी आगारात एसटी कंडक्टरला शिवीगाळ केल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काम व्यवस्थित केले नाही, तर मारहाण करण्याचीही त्यांनी धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरीतील एसटीने शाळेत जाणाऱ्या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आमदार बांगर यांच्याकडे एसटीच्या कंडक्टरच्या गैरवर्तणुकीविषयी तक्रार केली होती. त्यावर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन बांगर यांनी थेट एसटी आगार प्रमुखांना आपल्या कार्यालयात बोलवले. त्यानंतर एसटी वेळेत न आल्याने घरी जायलाही उशीर होतो. एसटी कंडक्टर विद्यार्थ्यांशी नीट बोलत नाही, गाडीतून खाली उतरवण्याची धमकी देतो, अशा तक्रारी विद्यार्थिनींनी बांगर आणि आगार प्रमुखांसमोरच मांडल्या.

Santosh Bangar Viral video :
Chandrashekhar Bawankule Reply : 'सामना'ची आग विझवावी लागेल...; बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा

त्यावर शाळा सुटण्याच्या ठीक वेळेतच विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध झालीच पाहिजे, आणि विद्यार्थ्यांसाठी चांगला कंडक्टर द्या, कंडक्टर विद्यार्थ्यांशी नीट बोलत नसतील तर त्याला पायाखालीच तुडवील असा थेट इशाराच बांगर यांनी आगार प्रमुखांना दिला. याचवेळी त्यांनी कंडक्टर आणि आगार प्रमुखांनाही शिवीगाळ केली.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे. बांगर यांनी संबंधित कंडक्टर वर कारवाई करण्याचे आदेश द्यायला पाहिजे होते. पण अशी शिवीगाळ करणे, मारहाण करण्याची धमकी देणे योग्य नाही, असा टोलाही त्यांन लगावला आहे. (Hingoli News) तसेच, आमदाराला असं वर्तन शोभते का, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com