Latur BJP Political News Sarkarnama
मराठवाडा

Latur BJP Political : रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ नये; `जलसाक्षरता` मोहीम यशस्वी करा...

राम काळगे

Marathwada Political News : पर्यावरणाच्या बदलामुळे पावसाचे प्रमाण घटत आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ असा असमतोल निर्माण झाला आहे. २०१६ मध्ये लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. (Latur Water News) पाणी जपून वापरावे, याबाबत जनजागृती व्हावी, भावी पिढीच्या नशिबी दुष्काळ येऊ नये, यासाठी माजी मंत्री, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी `जलसाक्षरता`, मोहीम हाती घेतली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेचे स्वागत करत सर्वांनी यात सहभागी होत मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन केले आहे. निलंगेकरांच्या जलसाक्षरता मोहीम महत्त्वपूर्ण आहे, असे कौतुकही (Devendra Fadnavis) फडणवीसांनी केले आहे. (Sambhaji Patil Nilangekar) आमदार निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात जलसाक्षरता रॅली सुरू आहे. निलंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते दुचाकींवरून दहा तालुक्यांत यामाध्यमातून पोहाेचणार आहेत.

आठशे किलोमीटरचा प्रवास करून एक हजार तीनशे गणेश मंडळांपर्यंत ही रॅली पोहोचणार आहे. ग्रामपंचायती, सेवा संस्था, गणेश मंडळ, बचत गट आदींकडून रॅलीला प्रतिसाद मिळत आहे. (Marathwada) लातूर जिल्ह्याला कायमस्वरूपी पाणी मिळावे, यासाठी जनरेटा वाढवण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आहे. गोदावरी खोऱ्यात सोडण्यात येणारे पाणी बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना मिळणार नाही, याची माहिती रॅलीतून दिली जात आहे.

जिल्हानिहाय पाण्याचा वाटा ठरवावा, अशी मागणी निलंगेकर यांनी केली आहे. जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी जल साक्षरता रॅलीचे आभियान राबवून पाण्याचे आगळेवेगळे महत्त्व पटवून देण्याच्या या प्रयत्नांची दखल देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली. निलंगेकर यांच्याकडून राबवण्यात येत असलेली मोहीम प्रेरणादायी असून, या कामात सातत्य असणे गरजेचे आहे.

मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत सिंचनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नात सर्वांचाच वाटा अवश्यक आहे. भविष्यात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनी सहभागी होऊन जलसाक्षरता मोहीम यशस्वी करावी, असे अवाहन त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT