Ajit Pawar-Mla Abhimanyu Pawar News Mumbai
Ajit Pawar-Mla Abhimanyu Pawar News Mumbai Sarkarnama
मराठवाडा

..तेव्हा गप्प बसले, आज अध्यक्षांना धमकावतायेत ; पवारांना अजितदादांकडून सबुरीचा सल्ला..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात वेळोवेळी आक्रमक होतांना दिसत आहेत. सभागृहाची प्रथा, परंपरा, नियम याची सातत्याने ते सदस्यांना आठवण करून देत आहेत. आज सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा औशाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांना बोलायचे होते, पण त्यांना संधी मिळाली नाही आणि पुढची लक्षवेधी तालिका अध्यक्षांनी पुकारली. यावर संतापलेल्या अभिमन्यू पवार यांनी अध्यक्षांना मला का बोलू दिलं नाही, मी काय केले? माझ्यावर अन्याय का केला? असा सवाल करत जाब विचारला.

यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी अभिमन्यू पवार यांना तुम्ही अशा पद्धतीने अध्यक्षांना बोलू शकत नाही, त्यांना धमकावल्यासारखे बोलू नका, असे सांगत सबुरीचा सल्ला दिला. विधानसभेत आज कामकाजाला सुरूवात झाली तेव्हा आमदार अभिमन्यू पवार हे एका लक्षवेधीवर बोलू इच्छित होते. (Maharashtra) परंतु पाचव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारत तालिका अध्यक्षांनी कामकाज पुढे नेले. यावर संतापलेल्या अभिमन्यू पवार यांनी अध्यक्षांशी वाद घाल त्यांना जाब विचारला.

पवार म्हणाले, मी सकाळी लवकर उठून बोलायचं म्हणून सभागृहात आलो, पण तुम्ही मला बोलू दिलं जात नाहीये. मी काय केले की तुम्ही मला बोलू देत नाही, माझ्यावर अन्याय का केला? हे तुम्ही सांगितलं पाहिजे. यावर अजित पवार यांनी अभिमन्यू पवार यांना समज देण्याचा प्रयत्न केला. अभिन्यू पवार हे कालपासून बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. माझं त्यांच्याकडे लक्ष होतं.

काल ते बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना संधी मिळाली नाही तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खाली बसण्याचा इशारा केला आणि ते गप्प बसले. आज देखील त्यांना बोलायचे होते, पण कामकाज पुढे निघून गेले, तेव्हा आग्रह न धरता थोडं सबुरीने घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही अध्यक्षांना धमकावू शकत नाही, अशी भाषा वापरणे चुकीचे आहे. तुम्ही सरकारमध्ये काम केलेलं आहे, तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही, असे सांगत त्यांना शांत केले. अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर कामकाज पुढे सुरळीत सुरू झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT