Beed Accident Sarkarnama
मराठवाडा

Beed Accident : अन् बीड पुन्हा हळहळलं! 'त्या' तिघांचं खाकी वर्दीचं स्वप्न एसटीच्या चाकांखाली चिरडलं

Beed-Parbhani ST bus accident : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे बीड-परळी मार्गावर पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांना भरधाव एसटी बसने चिरडलं आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jagdish Patil

Beed News, 19 Jan : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे बीड-परळी मार्गावर पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या 5 तरुणांना भरधाव एसटी बसने (ST Bus) चिरडलं आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड (Beed) तालुक्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बस जात असताना घोडका राजुरी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला 5 तरुण पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी रनिंग करत होते. यावेळी रनिंग करणाऱ्या पाचही तरुणांना भरधाव बसने चिरडलं.

यामध्ये बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी आहेत. पोलिस भरती करणाऱ्या 3 तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सिमेंटच्या रस्त्यावरून बस खाली सरकल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच या तरुणांच्या नातेवाईकांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून पोलिस या अपघाताचू सखोल चौकशी करत आहेत. मात्र, या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील अपघातांमुळे (Accident) होणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मृत्यूचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यासह देशातील अपघाताचे प्रमाण वाढलं आहे.

याला, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि चालकांचा वाहनांवर नसणारा ताबा अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. महामार्ग वाहतूक पोलीसांच्या आकडेवारीनुसार, मागील 32,801 एवढे अपघात झाले असून यामध्ये 13,823 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या अपघातांना आळा घालन्यासाठी सरकार काय पावलं उचलणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT