Dhananjay Munde : ...म्हणून बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना दिलं नाही; अजितदादांच्या शिलेदाराने सांगितलं खरं कारण

Praful Patel On Beed Guardian Minister post : राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ती जाहीर झाल्या आहेत. मात्र, बीडच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. ते चित्र काल स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
Ajit Pawar and Dhananjay Munde
Ajit Pawar and Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News, 19 Jan : राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ती जाहीर झाल्या आहेत. मात्र, बीडच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. ते चित्र काल स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यासह बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) चे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. प्रफुल्ल पटेल म्हणाले, "राज्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर झाली. अनेक मंत्र्यांना दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील दोन जिल्ह्याची जबाबदारी आहे. बीडमधील परिस्थितीमुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथं पालकमंत्री व्हावे, अशी परिस्थिती आहे आणि पक्षाने देखील याबाबत अशीच भूमिका घेतली आहे," असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Dhananjay Munde : "बीडचा रक्तरंजित पॅटर्न..." पालकमंत्रिपदावरून ठाकरे गटाने मुंडेंना डिवचलं तर अजितदादांकडे केली 'ही' मोठी मागणी

'मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत होत असलेले आरोप म्हणजे मीडियामध्ये जास्त आणि जमिनीवरील कमी, अशी परिस्थिती आहे. काही लोक हे प्रकरण मीडियामध्ये गाजवत आहेत. सत्य काय आहे ते समोर आलेच पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. मंत्री धनंजय मुंडे यांना इतर जिल्ह्याची ही जबाबदारी देता आली असती.

संघटना पातळीवर लवकरच निवडणुका

परंतु पक्षातील इतर मंत्र्यांचा देखील आम्हाला विचार करावा लागतो', असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. बीडमधली परिस्थिती पाहता आणि सत्य परिस्थिती समोर येईपर्यंत आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, असेही पटेल यांनी सांगितले. पक्ष 1999 पासून कार्यरत आहे. त्यात वेळोवेळी निवडणुका घेण्यात आल्या आहेत.

Ajit Pawar and Dhananjay Munde
Ahliyanagar Guardian Minister: मंत्रिमंडळात दुय्यम खातं, 'डिमोशन'ची चर्चा, अखेर ताकद पणाला लावून विखेंनी पुन्हा पालकमंत्रिपद आणलंच!

2023 नंतर पक्षात अनेक बदल झाले. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये मोठे बदल होणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपासून ते शहरातील शहराध्यक्षांपर्यंत सर्व पातळीवर निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी सदस्य नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात लवकरच पक्ष संघटनेमध्ये बदल दिसतील, असंही त्यानी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com