मराठवाडा

MLA Khopde on Tukaram Mundhe : 'तुकाराम मुंढेंच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह? आमदार खोपडेंनी थेट सर्वच 'काढले'!

MLA Khopde raises direct questions over IAS officer Tukaram Munde’s integrity : IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या प्रामाणिकतेवर आमदार खोपडेंनी थेट प्रश्न उपस्थित करत नवा वाद पेटला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली.

Rajesh Charpe

नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. आमदार कृष्णा खोपडे यांनाही मुंढे यांच्या समर्थकांनी दिलेल्या धमक्यांची गंभीर दाखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून चौकशीच करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मुंढे चांगलेच अडचणीच येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बदल्यांचा विक्रम नावावर असलेल्या मुंढे यांची ओळख कडक शिस्तीचे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधक अधिकारी अशी आहे. मात्र आमदार कृष्णा खोपडे यांनी नागपूर महापालिकेत असताना त्यांच्या स्वाक्षरीने झालेले गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले.

मुंढे नागपूरला रुजू झाले तेव्हापासूनच सत्ताधारी भाजपच आणि त्यांचे खडके उडायला सुरुवात झाली होती. को कोविडच्या काळात मुंढे यांनी रुग्णांसाठी एका आध्यात्मिक संस्थेत भलेमोठे तात्पुरते रुग्णालय उभे केले होते. यावर सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र हे रुग्णालय पावसात वाहून गेले. त्यानंतर येथील गाद्या, इतर साहित्याचे काय झाले कोणालाच ठाऊक नाही. त्याचा हिशेबही कोणाकडे नाही. किती रुग्णांवर येथे उपचार झाला, कोविडच्या कोण कोण येथे भरती होते याचाही कोणाला थांगपत्ता नसल्याचे खोपडे यांनी सांगितले.

महापालिकेचे आयुक्तांसोबतच मुंढे हे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक होते. स्मार्ट सिटीत कार्यरत असताना त्यांनी संबंधातील जवळच्या कंत्राटदाराला आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने पदाचा गैरवापर केला. २० कोटींच्या धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्या. चौकशीत हे सिद्ध झाले आहे. याची तक्रार सदर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिकार नसताना मुंढे यांनी २० कोटींचा निधी कंत्राटदाराला दिला.

धनादेशावर अकाऊंटची स्वाक्षरी घेतली जाते. मात्र मुंढे यांनी आपला अधिकार वापरला. एक महिला अधिकाऱ्याने यास विरोध केला होता. त्याचा राग म्हणून तिची प्रसूती रजा मुंडे यांनी नामंजूर केली होती. याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली. हा कुठला प्रामाणिकपणा असा सवालही खोपडे यांनी उपस्थित केला. मुंढे प्रामाणिकपणाचा देखावा करतात. यासाठी त्यांची एक टीम सोशल मीडियावर सक्रिय कार्यरत असते. मी मुंढे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडणार असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी धमक्या दिल्याचे आमदार खोपडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT