Sandip Kshirsagar : 'हा परळी पॅटर्न' आहे, म्हणत.., फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा

MLA Sandip Kshirsagar reveals a major claim in the Parli Pattern case : परळी पॅटर्न प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय व गुन्हेगारी घडामोडी वाचा.
Sandip Kshirsagar : 'हा परळी पॅटर्न' आहे, म्हणत.., फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा
Published on
Updated on

Beed Politics : परळीचा पॅटर्नच असा आहे, की यात गुन्ह्यातील फरार आरोपी सापडतच नाहीत. संतोष भैय्या देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या बाबतीतही असेच होईल, अशी भिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या खूनानंतर वीस दिवस फरार होता, त्या काळातला सीडीआर रिपोर्ट जर काढला तर सगळ बाहेर येईल. फरार आरोपीचे काय झाले, या सगळ्यामागे कोण आहे? असा दावाही क्षीरसागर यांनी केला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर क्रूरपणे झालेली हत्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या संतापजनक हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यातील काही आरोपी अटकेत असले तरी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. वर्षभरात पोलीसांना हा आरोपी सापडू शकलेला नाही. यावरून तो परत येणारच नाही, त्याची हत्या झाली अशा अनेक गोष्टींची चर्चा गेल्या काही महिन्यात झाली.

Sandip Kshirsagar : 'हा परळी पॅटर्न' आहे, म्हणत.., फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा
Maharashtra Safety Mascot Zebru : मुख्यमंत्र्यानी 'झेब्रु'च्या हाती दिली सुरक्षेची दोरी; काय आहे हा नवा उपक्रम?

या प्रकरणात सातत्याने आरोपींच्या अटकेची, त्यांच्या आकाच्या चौकशीची मागणई करत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर करत आहेत. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष झाल्यानंतर विधीमंडळ परिसरात त्यांना फरार आरोपी कृष्णा आंधळे, वाल्मिक कराड जामीनावर सुटणार या कथित ऑडिओ क्लिप संदर्भात विचारण्यात आले.

यावर परळीतील गुन्हेगारी आणि तेथील पॅटर्न बघितला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आरोपी सापडणारच नाही. संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा वीस दिवस फरार होता. त्याकाळात तो कुठे होता? कोणाच्या संपर्कात होता याचा तपास झाला पाहिजे. त्यासाठी त्या काळातले त्याचे सीडीआर काढले पाहिजे. त्यातूनच या सगळ्या प्रकरणात कोण सहभागी आहे, आरोपींना कोण वाचवत होतं? या गोष्टी स्पष्टपणे बाहेर येतील.

बीड जिल्हा राज्यभरात बदनाम झाला, इथे गुन्हेगारी वाढली आहे याचे कारण गुन्हेगारांना पाठीशी घालणारे लोक या जिल्ह्यात काम करतात. गुन्हेगारांना अशा पद्धतीने पाठीशी घालणारे नेते आहेत म्हणूनच गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. वाल्मिक कराड बेलवर बाहेर येणार असा दावा करणारी कथित ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर आमचे सगळ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष आहे, आम्ही वकीलांच्याही सातत्याने संपर्कात आहोत, त्यांच्याकडून सगळी माहिती वेळोवेळी घेत आहोत.

Sandip Kshirsagar : 'हा परळी पॅटर्न' आहे, म्हणत.., फरार आरोपी कृष्णा आंधळे संदर्भात आमदार संदीप क्षीरसागरांचा मोठा दावा
Smriti Irani’s Fitness Secret Formula : स्मृती इराणींच्या फिटनेसचा 'तो' खास फॉर्म्युला: 50व्या वर्षीही इतक्या 'फिट' कशा?

वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय आम्ही हा लढा थांबवणार नाही. वाल्मिक कराड जर जामीनावर सुटून बाहेर आला, तर मात्र आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. आम्ही शांत बसणार नाही, कुठल्याही परिस्थितीत संतोष भैय्या देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, याचा पुनरुच्चारही क्षीरसागर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com