pratap saranaik, kailas patil  Sarkarnama
मराठवाडा

Kaisal Patil : ठाकरेंचा वाघ ऑपरेशन टायगर पार्ट 2 मध्ये? कैलास पाटलांनी मंत्री सरनाईकांच्या दाव्यातील हवाच काढली

Operation Tiger remark News : धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरात बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गंभीर प्रश्न उपस्थित केला होता.

Sachin Waghmare

Dharashiv News : "तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि CCTV व्यवस्थेचा विषय हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे", असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर नाराजी व्यक्त केली.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना तुळजापूरमध्ये बसवलेल्या CCTVच्या माध्यमातून कैलास पाटील कुठे जातात, घरी कधी जातात आणि तुळजापूरला कधी येतात याची माहिती ठेवली जात असल्याचा मिश्किल टोला सरनाईक यांनी लगावला होता. या माहितीच्या आधारे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करू, असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले होते.

यावर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर टिंगल-टवाळी करणे योग्य नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. तसेच ‘माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा,’ असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि CCTV व्यवस्थेचा विषय हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. ‘CCTVच्या बाबतीत चायनीज-जपानी असे बोलणे पालकमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हते. एवढंच नव्हे तर CCTV प्रकरणातील मूळ मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा करून विषयाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोपही कैलास पाटील यांनी केला.

कैलास पाटलांनी व्यक्त केली होती चिंता :

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकाकडून टीका टिपण्णी सुरु आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता.

केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे CCTV कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. त्यावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर देताना केलेले विधान चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT