Babanrao Lonikar sarkarnam
मराठवाडा

बारा आमदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत..

शिवसेनेचे (Shiv Sena) बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत, ते शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केला आहे

सरकारनामा ब्युरो

नांदेड : भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) बारा आमदार आमच्या संपर्कातअसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

बबनराव लोणीकर म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के नापास सरकार आहे. आघाडी सरकार रोज घोषणा करतयं की, आमचं सरकार पडणार नाही, त्यांना का वाटतं हे सरकार पडेल. आम्ही कोणीही सरकार पाडू असं म्हटलेलं नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा कुठल्याही भाजपच्या नेत्याने असं म्हटलं नाही की हे सरकार पडेल,''

''शिवसेनेचे बारा आमदार नाराज आहेत. सुभाष साबणेंसह अनेक आमदार नाराज आहेत. शिवसेनेमध्ये खदखद आहे. हे बारा आमदार शिवसेना सोडण्याची तयारीत आहे, त्यांना न्याय मिळत नाही, त्यांच्या मतदारसंघात विकासाला निधी मिळत नाही. त्यामुळे त्याच्या मतदारसंघाचा विकास होत नाही,'' असे लोणीकर म्हणाले.

''महाविकास आघाडी सरकारचा शंभर अपराध केले असून त्यांचा पापाचा घडा भरला आहे. ज्या दिवशी पापाचा घडा फुटेल त्यादिवशी पापाचा पोळा फुटेल. महाविकास आघाडी पक्षातील तीनही पक्षातील बारापेक्षा अधिक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत,'' असा गैाप्यस्फोट यावेळी लोणीकर यांनी केला.

...तर उद्धव ठाकरे बेईमान झाले नसते

जळगाव : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना अन् भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे . बेईमानी कोणी केली यावरुन दोन्ही पक्ष एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. शिवसेनेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (shivsena gulabrao patil) यांनी भाजपवर घणाघात करीत प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते यांसारखे निष्ठावंत असताना उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री का केलं नाही? असा सवाल केला होता. त्यावर गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, हा जर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. पण हा एकट्या शिवसेनेचा विषय नव्हता. सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT