Marathwada Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन भाजपसोबत गेले होते, तर अजित पवारांनीही बंडाचा झेंडा फडकवत सत्तेत जाणे पसंत केले. (Ajit Pawar-Uddhav Thackeray Sabha) शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर तोफ डागली होती. तर त्याला त्याच ठिकाणी उत्तर सभा घेत शिंदेंनी देखील प्रत्त्युत्तर दिले होते.
आता हाच प्रयोग राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरू झाला आहे. (NCP) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटीरांच्या विरोधात स्वाभिमान सभा घेण्याचा धडाका लावला आहे. छगन भुजबळांच्या येवल्यात सभा घेतल्यानंतर नुकतीच त्यांनी मराठवाड्यातील बीडमध्ये सभा झाली. आता याच बीडमधील मैदानावर पुतणे अजित पवार (Ajit Pawar) येत्या २७ ऑगस्ट रोजी उत्तर सभा घेत आहेत. तर दुसरीकडे याच दिवशी हिंगोलीत उद्धव ठाकरे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.
बीड आणि हिंगोलीत एकाच दिवशी होणाऱ्या या दोन्ही सभांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. (Uddhav Thackeray) या जिल्ह्यात सहा पैकी चार आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. परंतु अजित पवारांच्या बंडानंतर यातील तीन आमदार हे त्यांच्यासोबत तर एकमेव संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत आहेत. (SHIVSENA) या बंडखोरीचा जाब शरद पवारांनी स्वाभीमान सेभेतून विचारला होता. त्यालाच आता २७ रोजी अजित पवार, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे इतर मंत्री उत्तर सभेतून प्रत्त्युत्तर देणार आहेत.
तिकडे हिंगोलीत उद्धव ठाकरे खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्या गद्दारीचा समाचार कसा घेतात? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बांगर, पाटील यांनी शिंदेंच्या बंडाला साथ दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच हिंगोलीत येत आहेत. तत्पुर्वी त्यांनी येथील शिवसैनिकांशी फोनवरून संवाद साधत नव्याने पक्ष उभा करू, असा विश्वास दिला होता.
आता प्रत्यक्ष एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांच्या भेटीसाठी ते येत आहेत. २७ रोजी हिंगोलीच्या रामलिला मैदानावर ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेच्या पुर्वतयारीची पाहणी करण्यासाठी खासदार विनायक राऊत हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची बैठक देखील घेतली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.