Cm Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : औरंगाबादकर महापालिकेवरचा भगवा कधी उतरू देणार नाही

औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून आपण तो केंद्राकडे पाठवला आहे. (Cm Uddhav Thackeray)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर झालेल्या विजयी सभा मला आजही आठवतात. (Aurangabad) ८७-८८ पासून महापालिकेवर असलेला भगवा औरंगाबादकरांनी कधी खाली उतरू दिला नाही, यापुढेही तो कायम राहिला असा मला विश्वास आहे, असे मत व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण लवकरच शहरवासियांच्या दर्शानासाठी येणार असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या वतीने नुतणीकरण झालेल्या संत एकनाथ नाट्यगृहाचे लोकार्पण आज करण्यात आले. (Shivsena) पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास उद्धव ठाकरे यांनी आॅनलाईन हजेरी लावली. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ठाकरे म्हणाले, औरंगाबादकरांनी शिवसेनेवर कायम भरभरून प्रेम दिले. निवडणुकीच्या काळात आम्ही यायचो, तुम्हाला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, वीज, उद्याने, नाट्यगृह देण्याचे आश्वासन द्यायचो आणि तुम्ही आम्हाला मतदान करायचे. तुम्हाला दिलेल्या प्रत्येक वचनाची मला आठवण आहे, इतर पक्षांसारखे आम्ही विसरलो नाही. त्यामुळेच अनेक वचनं आम्ही पुर्ण केली आहेत.

मला आठवते महापालिकेच्या निवडणुकीत गुंठेवारीचा विषय नेहमी निघायचा तो देखील आम्ही मार्गी लावला. समांतर जलवाहिनीचे भिजत घोंगड कायम होतो, त्यात देखील लक्ष घालून आम्ही पाण्याची योजना मार्गी लावली. कचरा आणि रस्त्यांचे प्रश्न देखील मार्गी लागले आहेत. आणखी जे प्रश्न असतील ते स्थानिक आमदार, खासदार शिवसेना नेत्यांनी पालकमंत्र्यांकडून सोडवून घ्यावेत.

शहराचा, जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास करून घेतांना कुठेही राजकारण किंवा पक्षभेद येता कामा नये. राज्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी जसे आम्ही आहोत, तसेच केंद्राशी संबंधित प्रश्न केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून मार्गी लावणे, त्याला वेग देणे अपेक्षित आहे. इथे कुठे राजकारण आणू नका, असे आवाहन देखील ठाकरेंनी केले.

व्यासपीठावर शिवसेने व्यतिरिक्त भाजपचे हरिभाऊ बागडे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीवरून अशीच एकजूट कायम राहिली तर शहराचा आणि मराठवाड्याचा विकास नक्की होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करून आपण तो केंद्राकडे पाठवला आहे.

आता केंद्र सरकार लवकरच त्याला मंजुरी देईल आणि आपण विमानतळाचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराज असा अभिमानाने करू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. शहरातील विकासकामे पाहण्यासाठी मी येत जाईल असे सांगितले होते, पण झाले नाही. यापुढे मात्र माझे बारकाईने लक्ष राहिल.

रस्ते, कचरा, पाणी हे विषय महत्वाचे आहेच, पण मनोरंजन आणि विरंगुळा यासाठी चांगल्या सुविधासह नाट्यगृह, सिनेमागृह, उद्याने देखील हवीत. त्यासाठीच आपण संत एकनाथ महाराजांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहाला नवे रुप दिले आहे. पैठणला आपण संतपीठ, संत ज्ञानेश्वरांचे उद्यान विकसित करत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT