Nawab Malik आक्रमक : किरीट सोमय्या भाजपची आयटम गर्ल

ईडीकडे सातत्याने केल्या जाणाऱ्या तक्रारी, नेत्यांविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप यावरूनच नवाब मलीक यांनी त्यांना राजकारणातील आयटमगर्लची उमपा दिल्याचे बोलले जाते. (Minister Nawab Malik)
Kirit Somaiya-Nawab Malik
Kirit Somaiya-Nawab MalikSarkarnama

नांदेड : एखादा चित्रपट जर हीट व्हायचा असेल तर त्यात आयटमगर्ल, तिचा डान्स घेतला जातो. सध्या राजकारणात अशीच एक आयटमगर्ल असल्याचा टोला राष्ट्रवादीचे (Ncp) प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somiaya)यांना लगावला आहे. किरीट सोमय्या ही भाजपची (Bjp) आयटमगर्ल असून आपल्या विधानांच्या बातम्या व्हाव्यात, त्याची राज्यभरात चर्चा व्हावी, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. सोमय्या हे राजकारणातील आयटमगर्ल असल्याचेही मलिक म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडत दोन्ही बाजुंचे नेते राजकारणात धुराळा उडवून देतांना दिसतात. यात भाजपचे किरीट सोमय्या आणि त्यांना जशास तसे उत्तर देणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यातील कलगितुरा मध्यंतरी चांगलाच गाजला.

नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात उडी घेत समीर वानखेडे आणि त्या माध्यमातून भाजप आणि विशेषत: माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांनी आपल्या पद्धतीने मलिक यांच्यावर पलटवार करत त्यांचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

तर दुसरीकडे भाजपचे किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते आणि मंत्र्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. अजित पवार, अनिल देशमुख, अॅड.अनिल परब, अर्जून खोतकर, अशोक चव्हाण अशी नेत्यांची मोठी यादी आणि त्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रारी करत सोमय्या यांनी रान उठवले होते.

Kirit Somaiya-Nawab Malik
लक्ष्मी हरवलीय म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस

एकूणच त्यांच्या या ईडीकडे सातत्याने केल्या जाणाऱ्या तक्रारी, नेत्यांविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप यावरूनच नवाब मलीक यांनी त्यांना राजकारणातील आयटमगर्लची उमपा दिल्याचे बोलले जाते. नांदडेमध्ये प्रसार माध्यमांनी मलिक यांना सोमय्यांबद्दल प्रश्न विचारताच, मलिक म्हणाले, किरीट सोमय्या ही भाजपची आयटमगर्ल आहे, त्यांच्यावर बेछून विधान करून चर्चेत राहायचे, त्याच्या बातम्या होतील हे पहायचे जबाबदारी सोपवण्यात आल्याचा आरोप देखील मलिक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com