Uddhav Thackeray And CJI DY Chandrachud Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray And CJI DY Chandrachud : 'गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही, हेच नशीब'; 'त्या' भेटीवर 'ठाकरी' चिमटा

Uddhav Thackerays comments on the meeting between Chief Justice Dhananjay Chandrachud and Prime Minister Narendra Modi : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर इथल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या भेटीवर कोपरखळी मारली.

Pradeep Pendhare

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या भेटीवर चिमटा काढला आहे.

उद्धव ठाकरे शिर्डीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महाअधिवेशन गाजवल्यानंतर पुढं छत्रपती संभाजीनगर दौऱ्याला रवाना झाले होते. उद्धव ठाकरेंचे हे दोन्ही दौरे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या भेटीवर चांगलीच कोपरखळी लगावली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी गणेशोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. गणपती बाप्पांची आरती देखील केली. पंतप्रधान मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भेटीची देशभर निंदा होत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर भाष्य केलं.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या भेटीची मी निंदा करणार नाही. मात्र, उलट मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो. कारण, त्यांनी त्यांच्या घरी मोदी येणार आहेत, म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही. देशात हा सगळा काय प्रकार चालू आहे, असं वाटतं की या लोकांनी नुसती थट्टा चालवली आहे, असं म्हटलं.

न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास, पण...

"दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत असून, हा खटला शिवसेनेचा नसून देशातील लोकशाही जिवंत राहणार की नाही, याचा आहे. न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. परंतु न्याय वेळेत मिळाला नाही, तर त्या न्यायालयापेक्षा मोठं न्यायालय, माझ्यासमोर आहे. हे न्यायालय जनतेचं न्यायालय आहे, आणि देशातील सर्वोच्च न्यायालय आहे. त्यामुळे मी आता जनतेच्या दरबारात असून, यावर सातत्याने मी जनतेच्या दरबाराच येत राहीन. त्यामुळे मला आता न्याय हवा आहे", असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

गद्दार धनुष्यबाण घेऊन येतील

"वैजापूरमधील प्रत्येक घरात शिवसेनेची मशाल पोचवा. येत्या काळात मशाल व धनुष्यबाण, अस दोन पर्याय असतील. गद्दार धनुष्यबाण घेऊन येतील. पण आपल्याकडे मशाल आहे. या निवडणुकीच्या अगोदर आमदार अपात्रतेसंदर्भात पक्ष कोणाचा याबाबतचा निकाल लागणं अपेक्षित आहे", असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT