Uddhav Thackeray sarkarnama
मराठवाडा

टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढवली; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची औरंगाबादच्या सभेत भाजपवर जोरदार टिका

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : भाजपच्या (BJP) प्रवक्त्यांनी प्रेशितांचा अपनाम केला. तुमचा संबंध काय? त्यामुळे देशाला माफी मागायची वेळ आली. आखाती देशात पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नाचक्की झाली. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढवली हे योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना (ShivSena) संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त जाहिर सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टिका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, भगवी टोपी घातली म्हणजे हिंदु होत नाही. हिंदुत्व डोक्यात असते, भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदुत्व असेल तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी काळी का? असा सवाल त्यांनी केला.

संभाजीनगर कधी करणार असे विचारले जात आहे. आम्ही विधानसभेत ठराव केला आहे. मंत्रिमंडळात ठराव झालेला आहे. विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले आहे. ते बदलत नाही. संभाजीनगर नामकरण करणारचे.. पण त्या आधी नावाला साजेल असे शहर करणार.. आधी विमानतळाचे नाव बदला आम्ही तुमचा सत्कार करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आमचे हिदुत्व मोजणारे तुम्ही कोण. तुम्हाला मोजपट्टी दिली का. एकदा होऊन जाऊद्या, शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केले आणि भाजपने काय केले ते बाबरी मशिद पाडली तेव्हा यांची पळापळ झाली होती. आमच्या अंगावर आला तर आम्ही त्यांच्या अंगावर गेल्या शिवाय राहणार नाही, अशा इशाराही त्यांनी भाजपला दिला. भाजपने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असे नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू, असा इशाराही ठाकरे यानी दिला. आमच्याकडे भगवा आहे. तो भगवा काहीतरी संस्कार हा वारकऱ्यांचा आणि शिवरायांचा भगवा आहे. हिंम्मत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करून दाखवा.

कोणाला हिंदुत्व शिकवता आहात? त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती तर आज हिंदुत्वाच्या जोरावर सत्ता स्थापन झाली असती का? काश्मीरी पंडितांनी पुन्हा एकदा घर सोडले आहे. घरामध्ये, कार्यालयामध्ये गोळ्या घातल्या जात आहेत. बाळासाहेबांनी काय सांगितले होते, मला देऊळात घंडा बडवणारे हिंदु नको आहेत, अतिरिक्यांना बडवणारे हिंदु पाहिजे. न्यायालयाचा आदेश आला, आणि जनतेकडे झोळ्या पसरवून मंदीर उभे रात आहे. तुमचे कर्तृत्व काय आहे, असेही ठाकरे म्हणाले.

देशासाठी जो मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचे हिंदुत्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करताना औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिले. त्याला आम्ही परके म्हणत नाही. तो आमचा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT