Uddhav Thackeray News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray News : राहुल गांधींपासून केजरीवालांपर्यंत; विरोधकांचा आवाज ठाकरेंनी केला बुलंद

Uddhav Thackeray, Rahul Gandhi News : तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव.

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi News : पदवी दाखवणार नाही, हा कुठला न्याय आहे, पदवीचा उपयोग काय दंड घेण्यासाठी करताय? पंतप्रधानांची पदवी मागितली, तर २५ हजार दंड होतो. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती मागितली होती. त्यामुळे त्यांना न्यायालयाने दंड केला. यावरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. तसेच राहुल गांधी खासदारकी रद्द झाली, त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष केले. विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या पत्नीला त्या गरोदर असताना सुद्धा चौकशी केली. बेशुद्ध पडे पर्यंत तपास यंत्रणांनी चौकशी केली, हे यांचे हिंदुत्व आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. तपास यंत्रणा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे लागल्या आहेत. तुमचा कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणतो. आम्ही गप्प बसायचे का? आम्ही काहीही बोलले तर आमच्यावर खटले दाखल होतात. मोदींना काहीही म्हटले तर ओबीसींचा अपमान. असे कसे चालेल, देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वल्लभभाई पटेल नसते, तर मराठवाडा मुक्त झाला नसता. त्यांनी मराठवाडा मोकळा केला. तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? वल्लभभाईंकडून काहीतरी घ्या. निवडणुका आल्या की लुटुपुटूचे काहीतरी करणार आणि मग पुन्हा येरे माझ्या मागल्या असे होते.

भाजपा न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवू पाहात आहे. न्यायालयामध्ये आपली माणसे घुसवायला प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक करताना आमचे ऐकल पाहिजे असे हे म्हणत आहेत. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, त्या दिवशी देशात आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

तसेच हे जगतमित्र आहेत. ओबामांनाही हाय ओबामा, सगळेच यांचे मित्र. इस्रायलमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक, पोलीस, सगळे अधिकारी संपावर गेले होते. रस्त्यावर उतरले. राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना झापले, असे राष्ट्रपती पाहिजे. तिथे पंतप्रधानांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. अखेर त्यांना कायदा मागे घ्यायला लागला. याला लोकशाही म्हणतात. आम्ही तुम्हाला निवडून दिले म्हणजे तुम्ही वाट्टेल ते करावे असे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT