Uddhav Thackeray Rally News : पोस्टरवरून गायब, सभेत मात्र राहुल गांधींचा ठाकरेंकडून उल्लेख..

Shivsena : ठाकरेंनी आपल्या भाषणात राहूल गांधी यांच्यावर झालेला अन्याय, त्यांची रद्द झालेली खासदारकी याचा उल्लेख केला.
Uddhav Thackeray-Rahul Gandhi News
Uddhav Thackeray-Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सत्तेसाठी हिंदुत्व सोडले असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) व त्यांच्या शिवसेनेवर सातत्याने भाजप आणि आता त्यांच्यासोबत गेलेल्या शिंदे गटाकडून केला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून तर ठाकरेंची कोंडी करण्याची संधीच भाजप व शिंदे गटाला मिळाली होती. त्याचा वापर करत ठाकरेंना त्यांची सावरकरांबद्दलची भूमिका काय? असा अडणीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न देखील भाजपकडून झाला.

Uddhav Thackeray-Rahul Gandhi News
Mahavikas Aghadi Rally News : व्यासपीठावर महाविकास आघाडी, मैदानात फक्त ठाकरेंची शिवसेना..

त्यामुळे मालेगाव येथील शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांबद्दल वाईट बोलू नये, असे जाहीर आणि स्पष्टपणे सांगावेच लागले. अर्थात ठाकरेंच्या या ठाकरी बाण्याचे पडसाद देखील काॅंग्रेसमधून उमटायला सुरूवात झाली. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) वादाची थिनगी तेव्हा पडली जेव्हा राज्यातील पहिल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेच्या बॅनरवरून राहुल गांधी यांना हटवले गेले.

परंतु हा वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी राज्यातील नेत्यांनी वाहिली. उद्धव ठाकरे यांनी देखील आजच्या सभेत राहुल गांधी यांचा उल्लेख करत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. मालेगावच्या सभेत केलेल्या उल्लेखामुळे काॅंग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुखावले गेले होते, ती चूक किंवा ठाकरेंनी `वज्रमुठ`, सभेच्या निमित्ताने सुधारल्याचे दिसून आले.

ठाकरे गटाकडून सभेच्या प्रसिद्धीसाठी मराठवाडा आणि शहरात लावलेल्या बॅनरवर राहूल गांधी यांना स्थान देण्यात आले नव्हते. पण काॅंग्रेसने मात्र आपल्या पोस्टरवर राहूल गांधी यांना प्राधान्य देत ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले होते. तात्विक विरोध दोन्ही बाजूंनी दर्शवल्यानंतर आजच्या पहिल्या आणि महत्वाच्या सभेला काॅंग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच गैरहजर राहिले.

प्रकृती बरी नसल्याचे कारण त्यांच्याकडून दिले जात असले तरी मालेगावच्या सभेत राहुल गांधी यांना सावरकरांबद्दल विधान न करण्याची ठाकरेंनी केलेली सूचना याचाच तो परिणाम असल्याचे बोलले जाते. हा वाद आणखी चिघळू नये यासाठीच ठाकरेंनी आपल्या भाषणात राहूल गांधी यांच्यावर झालेला अन्याय, त्यांची रद्द झालेली खासदारकी याचा उल्लेख केल्याचे बोलले जाते. आता एवढ्याने काॅंग्रेसचे समाधान होते का? हे पुढील काळात होणाऱ्या सभेतून स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com