Uddhav Thackeray, Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : हिंगोलीत हेमंत पाटलांना चितपट करण्यासाठी उद्धव ठाकरे टाकणार मोठा डाव

Hingoli Loksbha Constituency : हेमंत पाटील यांनी केलेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत.

Laxmikant Mule

Nanded Political News : दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यासाठी नांदेडमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची घोषणा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून करु शकतात. गेल्या काही महिन्यांपासून नागेश आष्टीकर यांचे हिंगोली जिल्ह्यातील दौरे वाढले होते.

2019 च्या निवडणुकीत या मतदासंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले हेमंत पाटील यांनी पक्ष फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेसोबत जाणारे मराठवाड्यातील ते एकमेव खासदार होते. हेमंत पाटील यांनी केलेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. दोन दिवसांच्या आपल्या हिंगोली-नांदेड दौऱ्यात ते नागेश आष्टीकर यांच्या उमेदवारीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वी रविंद्र वायकर (Ravindra Waikar) ठाकरे गटात असतांना त्यांनी नांदेडचा दौरा केला होता. नागेश आष्टीरकर यांच्या मळ्यात झालेल्या बैठकीत त्यांनी हिंगोली लोकसभा विजयाचे पेढे खायला पुन्हा याच मळ्यात येऊ, असा विश्वास व्यक्त करत आष्टीकर यांना लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले होते. पण त्यानंतर नुकतेच वायकर शिंदे गटात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्व आले आहे.

महाविकास आघाडीचे जागा वाटप येत्या एक ते दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. हिंगोलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार असल्याने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यात आले आहेत. हादगाव विधानसभा मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी 2014 ते 2019 या काळात प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील दिवंगत बापुराव पाटील आष्टीकर हे दोन वेळा आमदार, वसंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पंचायत समितीचे 17 वर्षे सभापती, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते.

नागेश आष्टीकर (Nagesh Ashtikar) यांना आपल्या वडीलांकडूनच राजकीय वारसा मिळालेला आहे. त्यांचा मतदार संघात चांगला जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. 2009 ते 2014 या काळात शिवसेना तालुका प्रमुख म्हणून आष्टीकर कार्यरत होते. सध्या त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलेले आष्टीकर यांनी जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळेही निर्माण केले आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात (Hingoli) हादगाव, किनवट, उमरखेड, कळमनुरी वसमत हिंगोली या सहा मतदारसंघांचा समावेश होतो. हादगाव विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची मजबूत पकड आहे. तसेच उमरखेड विधानसभा मतदारसंघ हादगावाला लागून असल्याने इथे आष्टीकरांचा चांगला जनसंपर्क आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत हिंगोलीच्या दौऱ्यावर आले होते. ही जागा महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे. या जागेसाठी खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. हिंगोली मतदार संघात शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट अशी लढत होण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT