Uddhav Thackeray- Narendra Modi  Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray News: मोदीजी, तुमचा आत्मा सैतानाला विकला की काय? ठाकरेंच्या भाषणातील 'हे' आहेत 10 मुद्दे

Chhatrapati Sambhajinagar Loksabha Election 2024: मी हाता-पायांची हालचाल करु शकत नव्हतो. त्याचवेळेला तुम्ही चेले चपाट्यांना घेऊन माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली, तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला वाटलं असेल?

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी सोमवारी (ता.13) मतदान पार पडत आहे.यात देशात 91 आणि महाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.त्यात पुणे, शिरूर, मावळ,बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, रावेर, नंदुरबार,अहमदनगर,शिर्डी,जालना या मतदारसंघाचा समावेश आहे.याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेतेमंडळींच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यात शुक्रवारी (ता.10)उद्धव ठाकरेंची तोफ छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाडली.

महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप, शिंदे गटावर तुफानी हल्ला चढवला.

ठाकरे म्हणाले,मोदीजी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला तुम्ही नकली संतान म्हणतात. अहो, तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला की काय? जसं तुम्ही अदानीला सगळं विकलंय तसाच तुमचा आत्मा सैतानाला विकलेला दिसतोय. अशी थेरं कशाला करता आहात.अशी टीकेची झोड उठवतानाच आता त्यांना मी कधीही माफ करणार नाही असेही त्यांनी यावेळी ठणकावले.

संभाजीनगरात दारूवाला हवाय की पाणीवाला हवाय? असा सवाल करत शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला.तसेच जालन्याचे भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंवरही खोचक टीका केली. ते म्हणाले,जालन्यात रावसाहेब दानवे हे गेले 5 टर्म म्हणजे 25 वर्ष खासदार आहेत, त्यांना विचारावे आता तरी जाल ना. जालनाकरांचं कल्याण करण्याकरिता आज तिथं जाणार होतो मात्र पाऊस आला आणि हेलिकॉप्टर उडणे शक्य नव्हते म्हणून त्याठिकाणची सभा रद्द करावी असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंच्या भाषणातील हे आहेत ठळक 10 मुद्दे

- महाराष्ट्र मोदींना कधीही क्षमा करणार नाही.

- पंतप्रधानांनी पोलीस बाजूला ठेवून रस्त्यावर फिरावं.

- गुजरातमधली कांदाबंदी उठवली मग महाराष्ट्रातील का नाही ?

- मोदींनी महाराष्ट्रावर 10 वर्ष फक्त आघात केला.

- सर्व पक्ष फोडूनही मोदी मला, पवारांना डोळा मारत आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार अमानुष.

संभाजीनगरात 'दारू'वाला हवाय की 'पाणी'वाला हवाय?

जालन्यात आता रावसाहेब विचारावे आता तरी जाणार का, आता तिथं कल्याण पाहिजे कल्याण करायला.

माझा पक्ष पळवला, चिन्ह चोरले,माणसे फोडली तरी तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटतेय.

मी हाता-पायांची हालचाल करु शकत नव्हतो. त्याचवेळेला तुम्ही चेले चपाट्यांना घेऊन माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली, तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला वाटलं असेल?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT