Disha Salian Case : दिशा सालियान हिचा मृत्यू दुर्दैवी आहे, पण या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नाही, आम्ही तिला ओळखत देखील नाही. तरीही सीबीआयच्या एफआयआरमध्ये माझे, आदित्यचे नाव टाकले गेले. हा राजकीय षडयंत्राचाच भाग आहे. त्यांना काय करायची ती चौकशी करू द्या? असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले.
'जे चारित्र्य हनन गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे, ते आता थांबले पाहिजे, अन्यथा मला कायदेशीर पाऊल उचलावे लागेल.', असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्या, या प्रकरणात तुमच्यापैकी कोणाचेही नाव येऊ शकते? असे पत्रकारांना म्हणत उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावर आपण आतापर्यंत काहीच बोललो नाही. पण यापुढे चारित्र्य हनन खपवून घेणार नाही, असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान, सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावर सुरू असलेल्या सुनावणीवरही भाष्य केले. दिशा सालियान प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरमध्ये माझे आणि आदित्य ठाकरेचे नाव घेतले गेल्याचे उद्धव ठाकरे यांनी मान्य केले. दोन वर्षापासून या प्रकरणाशी आमचा कुठलाही संबंध नसताना आरोप केले जात आहेत.
पण आम्ही आतापर्यंत यावर कधीही बोललो नाही, आताही मला जास्त बोलायचे नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे, झाले ते वाईटच आहे. आदित्य ठाकरे काय किंवा आम्ही कोणीही दिशा सालियानला ओळखत नाही, आमची तिच्याशी कधी भेटही झाली नाही. तरी देखील एफआयआरमध्ये आमची नावे घेतली गेली. निश्चितच हा एका राजकीय षडयंत्राचा भाग आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर सुरू असलेल्या सुनावणीतील काही निरीक्षणा संदर्भात पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दाराची चोरी आता उघडी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, पक्ष आणि चिन्ह या लोकांनी चोरले. चोरीचा माल आपला दाखवून श्रीमंती दाखवण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. तुमचा निर्णय योग्य होता, तर मग तुम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन निवडणुका का लढला नाहीत? चोरीचा माल आपलाच म्हणण्याचा गद्दारांचा डाव त्यांच्यावरच उलटला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.