Uddhav Thackeray and Devndra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray Rally News : मोदी- शहांना झोडपले, फडणवीसांचा साधा उल्लेखही नाही..

Shivsena : ठाकरेंच्या आजच्या भाषणात भाजप राज्यातील नाही, तर केंद्रातील नेतृत्वावरच निशाणा होता की काय?

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले असा आरोप करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर उद्धव ठाकरे `वज्रमुठ`, सभेत चांगलेच बरसले. गृहमंत्री अमित शहा, (Amit Saha) पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी राज्यातील फडणवीसांसह इतर नेत्यांचा साधा उल्लेख देखील सभेत केला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी नुकताच कोरोना काळात राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत दीडशे बैठका झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. तत्पुर्वी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे (Uddhav Thackray) आणि फडणवीस हे एकाचवेळी विधानभवनात आले, तेव्हा त्यांनी एकमेकांकडे पहात हसत माध्यमांना छायाचित्रे दिली होती.

त्यानंतर सभागृहात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंना `पुन्हा एकदा विचार करा`, म्हणत साद घातली होती. त्यामुळे राज्यात ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येणार का? याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. महाविकास आघाडीच्या राज्यातील पहिल्याच संयुक्त सभेत उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांवर तुटून पडतील असे अपेक्षित असतांना त्यांनी फडणवीसांचा साधा उल्लेख देखील केला नाही.

त्यामुळे ठाकरेंच्या आजच्या भाषणात भाजप राज्यातील नाही, तर केंद्रातील नेतृत्वावरच निशाणा होता की काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. ज्या फडणवीसांवर उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचण्याचा, अख्खा पक्ष फोडल्याचा आरोप आहे, त्या फडणवीसांवर ठाकरेंनी चक्कार शब्द देखील काढू नये? याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

या उलट ठाकरेंनी गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेल्या मंत्री, आमदारांनाच टार्गेट केले होते. आमदार संजय शिरसाट आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार वगळता इतर कुणाचाही उल्लेख ठाकरेंनी आपल्या भाषणात केला नाही. त्यांचा सगळा रोख हा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर होता हेच त्यांच्या पाऊण तासाच्या भाषणातून दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT