Shivsena UBT March For Affected Farmers In Marathwada News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT : अखेर ठरलं.. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 रोजी शिवसेनेचा ' हंबरडा' मोर्चा

Marathwada Heavy Rainfall Affected Farmers : पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान या गावभेटीचा कार्यक्रम संपल्यानंतर आठ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा व तहसील कार्यालय समोर धरणे आणि निदर्शने करण्यात येणार आहेत.

Jagdish Pansare

  1. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा “हंबरडा मोर्चा” ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

  2. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आणि शासनाच्या धोरणांविरोधात हा मोर्चा आयोजित केला जात आहे.

  3. ठाकरे गटाकडून या मोर्चाद्वारे मोठ्या घोषणा आणि शक्तिप्रदर्शनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marathwada News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा या मागणीसाठी मराठवाड्यात लवकरच शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. या मोर्चाची जबाबदारी शिवसेना नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवण्यात आली होती.

त्यानंतर आज या मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली असून येत्या 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मराठवाडा व्यापी 'हंबरडा मोर्चा' काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची पूर्वतयारी सुरू असून पाच ते 11 ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ग्रामसभा, गाव बैठका, गाव भेटी असा कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राबवण्यात येणार आहे.

पाच ते सात ऑक्टोबर दरम्यान या गावभेटीचा कार्यक्रम संपल्यानंतर आठ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा व तहसील कार्यालय समोर धरणे आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. तर 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा 'हंबरडा' मोर्चा निघणार आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मोर्चा संदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्रासह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराच्या परिस्थितीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतानाच सरकारकडून तातडीची मदत मिळवून देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार मुंबईच्या दसरा मेळाव्यात सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल चढवताना बिहारला न मागता पॅकेज देणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला संकट काळात भरघोस मदत करावी, महाराष्ट्र हा देखील देशाचाच भाग आहे, असा टोला लगावला होता.

या आहेत प्रमुख मागण्या

अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्वरित थेट आर्थिक मदत मिळावी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती पंजाबच्या धरतीवर 50 हजार रुपये हेक्टरी मदत पीक विम्याचे नवीन निकष रद्द करून पूर्वीचे निकष कायम ठेवावेत घरे आणि पशुधन नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, आदी मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहेत.

FAQs

1. ‘हंबरडा मोर्चा’ कधी आणि कुठे होणार आहे ?

👉हा मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

2. या मोर्चाचे नेतृत्व कोण करणार आहे?
👉 उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

3. मोर्चाचा उद्देश काय आहे?
👉 महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगारी, आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारविरोधात अवाज उठवणे हा उद्देश आहे.

4. या मोर्चात कोणकोण सहभागी होणार आहेत?
👉 ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक, शेतकरी सहभागी होणार आहेत.

5. या मोर्चामुळे वाहतुकीवर परिणाम होईल का?
👉 होय, संभाजीनगरातील काही मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत अडथळे येऊ शकतात. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची तयारी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT