Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Beed-Dharashiv News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray News : आमचं सरकार असतं तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नसते! उद्धव ठाकरे म्हणाले, दगाबाजांना जाब विचारा

Uddhav Thackeray Visit Affected Farmers in Marathwada : कर्जमुक्ती केली तरच येणार्‍या निवडणुकीत मतदान करू असे ठाम पणे सांगा. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Jagdish Pansare

  1. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, त्यांच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले नसते.

  2. त्यांनी सरकारवर टीका करत “दगाबाजांना जाब विचारा” असा थेट संदेश दिला.

  3. शेतकऱ्यांच्या वेदनांवरून उद्धव ठाकरेंनी जनतेला सावध राहण्याचं आवाहन केलं.

Marathwada Political News : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणि मी मुख्यमंत्री असताना कोणत्याही अटीशर्तीशिवया आम्ही शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती दिली होती. आज आपलं सरकार असतं तर मी शेतकऱ्यांना रडू दिलं नसतं, त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नसते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी दगाबाज सरकारला जाब विचारा, असे आवहन केले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत या मागणीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. चार दिवस मराठवाड्यातील आठ जिल्हे, बावीस तालुक्यातील आठशेहून अधिक शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या नांदर गावात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानतर ठाकरे बीड जिल्ह्यातील पाली गावात पोहचले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना महायुती सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा मुहूर्त जून मध्ये काढला आहे. निवडणूकीपर्यंत घरातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता आता अनेक अटी लावून लाभार्थी कमी केले जात आहे. हे दगाबाजीतून आणि मतचोरीतून सत्तेवर आलेले सरकार आहे. राज्य काय किंवा केंद्र काय? शेतकर्‍यांना हमी भाव मिळतो आहे का? याचे उत्तर मोदींनी द्यावे,असे सांगतानाच कर्जमाफीनंतर शेतकरी मतदान करतील, अशी भूमिका ठेवावी लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

कर्जमुक्ती केली तरच येणार्‍या निवडणुकीत मतदान करू असे ठाम पणे सांगा. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जगातली सर्वात मोठे पॅकेज सांगणाऱ्यांनी नुकसान भरपाई कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली कर्जमुक्ती शेतकर्‍यांना मिळालीच नाही. शेतकरी फुकट नव्हे तर हक्काची कर्जमुक्ती मागत आहे. सरकारच मत चोरी करून आले आहे तर त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे.

मराठवाडा, महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत आहे. मी तुमच्यात असताना राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये आहेत. बिहारवर अधिक प्रेम असताना महाराष्ट्र सावत्र आहे का? असा ठाकरेंनी केला. शेतकर्‍यांसोबत शिवसेना उभी आहे, शेतकरी म्हणुन एकत्र आलो तर कोणतेही सरकार झुकू शकते तर राज्य सरकार का झुकणार नाही? असेही ते म्हणाले.

धीर सोडू नका

शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. इतिहासातली सर्वात मोठी भरपाई ही मोठी थाप आहे. राज्य शासनाला शेतकर्‍यांची थट्टा करायला लाज वाटत नाही. राज्य सरकार दगाबाज आहे, त्यामुळे दगाबाज लोकांशी दगाबाजी करण्यात काहीही गैर नाही. शेतकरी राजा रडतोय, त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. विमा तर बंदच केला आहे. शेतकरी विमा भरतो तेवढाही विमा मिळत नाही. या दगाबाज सरकारच्या विरोधात आपल्याल लढा द्यायचा आहे, कोणीही धीर सोडू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात हिंदूनी मुले दोन पेक्षा जास्त जन्म घालावी. आणि राज्य सरकार दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळत आहे, असा टोला ठाकरेंनी यावेळी लगावला. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको मात्र हमीभाव द्या, असे शेतकरी म्हणतात. शेतकरी स्वाभिमानी आहे त्याला राज्य सरकारची भीख नको, शेतकरी हक्क मागतोय. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला कर्जमाफी आणि हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई हवी आहे.

राज्य सरकार निवडणुक आल्यानंतर जातीयवाद करणार आहे. आपण शेतकरी म्हणुन एकत्र आलं पाहिजे, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले. दगाबाज राज्य सरकारला मतं हवेत त्यामुळे 30 जून पर्यंत कर्जमाफी हवी असल्याचे सांगत आहे. कर्जमाफी नाही तोपर्यंत राज्य सरकारला मत नाही, अशी भूमिका घ्या, असेही ते म्हणाल.

FAQs

प्रश्न 1: उद्धव ठाकरे यांनी सरकारवर का टीका केली?
उत्तर: त्यांनी शेतकऱ्यांच्या दु:खाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

प्रश्न 2: उद्धव ठाकरे यांनी कोणाला “दगाबाज” म्हटलं?
उत्तर: त्यांनी शिवसेना फोडणाऱ्यांना आणि सत्तेत सहभागी झालेल्यांना “दगाबाज” म्हटलं.

प्रश्न 3: हे वक्तव्य कुठे करण्यात आलं?
उत्तर: मराठवाड्यातील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.

प्रश्न 4: उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांबद्दल काय म्हटलं?
उत्तर: त्यांनी सांगितलं की आमचं सरकार असतं तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले नसते.

प्रश्न 5: जनतेला उद्धव ठाकरेंनी कोणता संदेश दिला?
उत्तर: त्यांनी जनतेला दगाबाजांना ओळखून त्यांना जाब विचारण्याचं आवाहन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT