Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Paithan News Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray News : माझा शेतकरी भोळाभाबडा, सरकारकडून त्याची थट्टा! मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे संतापले

Uddhav Thackeray Visit Affected Farmers In Paithan : उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी संवाद या चार दिवसाच्या मराठवाडा दौऱ्याची सुरवात आज पैठण तालुक्यातील नांदर येथून झाली.

Jagdish Pansare

  1. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आरोप केला की, भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे.

  2. त्यांनी म्हटलं की सरकार शेतकऱ्यांच्या वेदना ऐकण्याऐवजी राजकारण करत आहे.

  3. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Shivsena UBT News : इतिहास कधी नव्हे ती एवढी आपत्ती माझ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यावर आली आहे. सगळ्यात मोठे पॅकेज दिल्याचा दावा दगाबाज सरकार करतयं. प्रत्यक्षात अद्याप मदत न देता शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. माझा शेतकरी भोळाभाबडा आहे, पण तो जमीनीतून कोंब फोडू शकतो तर या सरकारलाही फोडू शकतो, असा इशारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी संवाद या चार दिवसाच्या मराठवाडा दौऱ्याची सुरवात आज पैठण तालुक्यातील नांदर येथून झाली. यावेळी शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला. दोन रुपये-चार रुपये तर कुठे 89 रुपये पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली आहे. ही मदत नाही तर केवळ थट्टा आहे. बळीराजाची अशी थट्टा करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण राज्य सरकार फक्त अभ्यास करत आहे. मी मुख्यमंत्री असताना कसलीही मागणी नसताना कर्जमुक्ती केली. राज्य सरकारकडे कर्जमुक्तीसाठीची संपूर्ण यंत्रणा आहे. मग आता कर्जमुक्ती केली तर बँकाना फायदा होईल आणि जूनमध्ये केली तर होणार नाही, हा सरकारचा दावा हास्यास्पद असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

केंद्राचे पथक मराठवाड्यासह राज्यात आता पाहणीसाठी येणार आहे. हे पथक शेतकऱ्यांची वाट लावणार असून पॅकेज ही निव्वळ थट्टा आहे. नुकसान भरपाई अजून कोणालाच मिळालेली नाही. पीक विमा 2 किंवा 3 रुपये देऊन शेतकर्‍यांची थट्टा सुरू आहे. एका शेतकर्‍याला 89 रुपये मिळाले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि पीकविमा कंपन्यांचे साटलोटं असल्याचा आरोप केला.

न्याय मिळेपर्यंत शेतकर्‍यांच्या पाठीशी

अतिवृष्टी, महापूराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ, असे म्हणाले. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत. मदतीच्या नावाने सरकार आळस करत आहे. कर्जमुक्ती जूनमध्ये करू असे सरकार सांगत आहे. पण आम्हाला ते मान्य नाही, कर्जमुक्ती तात्काळ झाली पाहिजे. शेतकरी हताश झाला आहे. आता त्याला मदत केली नाही तर तो संकटात जाईल. हे सरकार खोटे बोलणारे आहे, दगाबाज आहे. म्हणून आम्ही या दगाबाज सरकारला जाब विचारण्यासाठी मराठवाड्यात आलो आहोत.

या सरकारच्या विरोधात आम्ही उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शेतकरी म्हणुन एकत्र आलो तरच न्याय मिळणार आहे. शेतकरी जमिनीतून कोंब फोडू शकतो तर राज्य सरकारला नक्कीच फोडणार आहे. इकडे शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बिहार मध्ये प्रचार करत आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

FAQs

प्रश्न 1: उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका का केली?
उत्तर: त्यांनी म्हटलं की सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असून त्यांची थट्टा करत आहे.

प्रश्न 2: उद्धव ठाकरे यांनी कोणत्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला?
उत्तर: शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जमाफी आणि पिकांच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून.

प्रश्न 3: ही टीका कुठल्या कार्यक्रमात करण्यात आली?
उत्तर: मराठवाड्याताली पैठण तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

प्रश्न 4: उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं?
उत्तर: त्यांनी सांगितलं की शिवसेना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायम आवाज उठवेल.

प्रश्न 5: या वक्तव्यावर सरकारची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: सरकारने ठाकरेंचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT