Umarga Lohara Assembly Sarkarnama
मराठवाडा

Umarga-Lohara Assembly Election : लोकहिताच्या कामांमुळे मतदार चौथ्यांदा संधी देतील :  ज्ञानराज चौगुले

Umarga-Lohara Assembly Election : लोहारा येथे औद्योगिक वसाहत मंजूर करून घेणार, बेन्नीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करणार- चौगुले

सरकारनामा ब्यूरो

Umarga-Lohara Assembly Election : पंच्याहत्तर वर्षांचा कालावधी पाहता तीन टर्मच्या पंधरा वर्षांत उमरगा, लोहारा तालुक्याच्या विकासासाठी भरभरून निधी प्राप्त करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे.

सर्व समाजघटकांना न्याय देत लोकहिताची कामे केल्याने प्रचारादरम्यान लोकांमधून स्वयंस्फूर्तीने मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे सहकार्य होणार असल्याचा विश्वास वाटतो, अशी भावना उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार तथा उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केला.

ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांची व वचननामाची माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे नेते जितेंद्र शिंदे, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य ॲड. अभयराजे चालुक्य, अनिल ऊर्फ पप्पू सगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जाफरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, बहुजन रयत परिषदेचे दिलीप गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे विजय तोरडकर, राजा शिंदे आदींची उपस्थिती होती.

आमदार चौगुले यांनी पुढील पाच वर्षांत केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला पंधरा हजार, वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला २१०० रुपये, २५ लाख तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणार असल्याचे ते म्हणाले.

लोहारा येथे औद्योगिक वसाहत मंजूर करून घेणार, बेन्नीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करणार तसेच कोळसुर पाटबंधारे ते तुरोरी मध्यम प्रकल्प जोडकालव्याची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करून घेणार, असे आश्वासन चौगुले यांनी दिले.

माकणी येथून मंजूर असलेली उमरगा व लोहारा शहरासाठी तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणार, धाकटे पंढरपूर म्हणून परिचित असलेले माकणी डॅम जवळ पर्यटनस्थळ विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT