
Osmanabad-Kalamb Assembly Election : लोकसभेत भाजपचा पराभव झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला `लाडकी बहीण`असे नाव दिले असले तरी ही योजना लाडक्या खुर्चीसाठी तयार केली आहे.
भाजपने जनतेच्या मतांचा अनादर करत सत्ता मिळविली. आता निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांसाठी महिला मतदारांना भुलविण्याचे पाऊल उचलले आहे, अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली.
कळंब तालुक्यातील खडकी येथे आयोजित सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर आक्रमक शब्दात टीका केली. हा बाण बाळासाहेबांचा नाही तर मोदी-शहा यांनी चोरलेला बाण आहे.
अशा लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून आपला स्वाभिमानी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले. हिंदुत्ववादी म्हणून गळा काढणाऱ्या भाजपचे हिंदुत्व नकली आहे. अन्यथा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांचा पक्ष फोडला नसता.
ज्या चिन्हावर बाळासाहेबांचा निष्ठावंत प्रेम करतो, तेच चिन्ह चोरले. आता त्यांना त्या चिन्हावर मताची भीक मागावी लागत आहे. ही गद्दारी गाडून महाविकास आघाडी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल.
महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस, तेल, जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत. सरकारच्या योजना केवळ मतांसाठीचा एक पोकळ गाजावाजा आहे. त्यातून सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत भाजपने शेतकरी विरोधी धोरणे राबविली आहेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतावर १८ टक्के जीएसटी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव खर्च सहन करावा लागत आहे.
हेलिकॉप्टरवर ५ टक्के जीएसटी, तर ट्रॅक्टरसारख्या शेतकऱ्यांसाठी गरजेच्या वस्तूवर हा कर अधिक आहे. उद्योगपतींचे १५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते. मात्र, शेतकऱ्यांना विविध अटी-शर्ती लावून कर्जमाफीपासून दूर ठेवले जाते, असा आरोपही कैलास पाटील यांनी आपल्या भाषणातून केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.