Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve: मंत्री दानवेंनी राखली जालनाकरांची मर्जी; बैलगाडीतील फेरफटक्यानंतर आता सायकल सवारी!

MP Raosaheb Danve bicycle Ride : काही महिन्यांपूर्वीच स्वतः बैलगाडी चालवत शेतात फेरफटका मारताना दिसले होते.

Ganesh Thombare

Jalna News: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या ग्रामीण भाषणशैली आणि रोखठोक विधानामुळे कायम चर्चेत असतात. ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये रावसाहेब दानवे यांचे नाव कायम पुढे असते. ग्रामपंचायत सदस्य ते थेट केंद्रीयमंत्रिपदापर्यंत मजल मारली असली तरी त्यांनी ग्रामीण भागाशी असलेली नाळ कधी तुटू दिली नाही.

मंत्री दानवे हे कधी जमिनीवर बसून जेवताना, तर कधी गावकऱ्यांसोबत सारीपाट खेळताना दिसतात, तर कधी बैलगाडीतून फेरफटका मारताना दिसतात. आतादेखील रावसाहेब दानवे यांनी जालन्यात नागरिकांच्या आग्रहाखातर सायकल सवारी केली. त्यांचा सायकल सवारी करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री असल्यामुळे ते दिल्लीत असतात. पण दिल्ली दौरा आटपून आपल्या मतदारसंघात आले की, नेहमी आपल्या शेतशिवारात फेरफटका मारतात. काही महिन्यांपूर्वीच स्वतः बैलगाडी चालवत शेतात फेरफटका मारताना दिसले होते, तर काही दिवसांपूर्वी किचनमध्ये भाकरी थापतानादेखील पाहायला मिळाले होते.

एवढंच नाही तर मंत्री दानवे हे आपल्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत असतात. राजकारण, रेल्वे खात्याचा एवढा मोठा कार्यभार, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, पक्षाचे काम तरीदेखील न थकता, न चिडचिड करता दानवे सगळ्यांशी हसून खेळून बोलतात. मंत्री दानवे कुठेही असले तरीदेखील दररोज सकाळी न चुकता व्यायाम हा त्यांचा नित्यक्रम असतो. त्यामुळे मंत्री दानवेंची बातच न्यारी, असंही त्यांना संबोधलं जातं.

मंत्री दानवेंच्या भाषणाची चर्चा तर कधी त्यांच्या स्टाईलची चर्चा असते. इतकंच नाही तर राज्यातले अनेक लोक त्यांच्या या स्टाईलचे चाहते आहेत. आपल्या भाषणाने खदखदून हसवणारे दानवे हे सायकल सवारीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT