Ramdar Athawale, Pritam Munde News 
मराठवाडा

Ramdas Athawale News : 'माझ्या कामाला आला स्पीड; कारण माझ्या पाठीशी उभा होता मुंडेंचा बीड'

Pritam Munde News : दिवंगत मुंडेंमुळे आपल्याला राज्यसभा मिळण्यास मोठी मदत झाली.

Amol Jaybhaye

Beed News : 'माझ्या कामाला आला स्पीड; कारण माझ्या पाठीशी उभा होता गोपीनाथ मुंडे यांचा बीड' अशा आपल्या खास शैलीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. दिवंगत मुंडेंमुळे आपल्याला राज्यसभा मिळण्यास मोठी मदत झाली. माझ्या राजकीय आयुष्यात बीड जिल्ह्याची ताकद सदैव माझ्या मागे राहिली आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवंगत मुंडेंच्या बालेकिल्ल्यात येताना मनस्वी आनंद झाल्याची भावनाही आठवले यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या वतीने व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी काही काळापूर्वी झालेल्या मोफत पूर्व तपासणी शिबिरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना सहायक साधनांचे मोफत वितरण रविवारी रामदास आठवले व खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या हस्ते झाले.

या वेळी आमदार नमिता मुंदडा, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अक्षय मुंदडा, सर्जेराव तांदळे, भगवान केदार, स्वप्नील गलधर आदींची उपस्थिती होती. आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात विकासाचे काम होत आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून आज देशभरात एकूण ७४ ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाची कामे भविष्यातही अशीच सुरू राहतील. महाराष्ट्रात अनेक योजनांच्या माध्यमातून २० कोटी ७४ लाख रुपयांचा १३ हजार दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात आले आला आहे. दिव्यांगांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT