Mahesh Shinde News : ग्रामपंचायत सदस्यसुद्धा अपात्र होत नाही, आम्ही तर आमदार; महेश शिंदेंना भलताच कॉन्फिडन्स

Shiv Sena MLA Disqualification News : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही. जे काही झालेले आहे, ते कायद्याला धरून झालेले आहे.
Mahesh Shinde News
Mahesh Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Koregaon News : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही. जे काही झालेले आहे, ते कायद्याला धरून झालेले आहे. त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष विचार करूनच निर्णय देतील, असा विश्वास आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी व्यक्त केला. कोरेगाव येथे रविवारी झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व पक्ष प्रवेश कार्यक्रमानंतर आमदार शिंदे बोलत होते.

आपल्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना महेश शिंदे यांनी वरील मत व्यक्त केले. आमदार अपात्र होणार असे सातत्याने म्हणणाऱ्यांनी एकदा ग्रामपंचायत निवडणूक लढवावी. सदस्य अथवा सरपंच अपात्र करण्याचे प्रयत्न करावेत म्हणजे कळेल की ते किती अवघड असते. अहो पाच वर्षांत कधीही सदस्य अपात्र झाला नाही.

Mahesh Shinde News
Nana Patole On Nagpur : नाना पटोलेंचा फडणवीस अन् गडकरींवर हल्लाबोल; म्हणाले, 'नागपूरची अवस्था भाजपच्या भ्रष्ट...'

माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत आम्ही एकही सदस्य अपात्र करू शकलो नाही. हे तर आमदार आहेत, ते किती हुशार असतील; मग लक्षात घ्या. सदस्य अपात्र झालाच तर तो तब्बल सहा वर्षांनी होतो, तोवर त्याची मूळ मुदत संपलेली असते. आमच्या खातगुण ग्रामपंचायतीचा सरपंच अनिल साठे हा पहिल्याच वर्षी अपात्र ठरला. आम्ही उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली. प्रत्यक्ष निकाल तब्बल सहा वर्षांनी आला, असेही शिंदे यांनी नमूद केले.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनाही आमदार पद अपात्रतेची नोटीस निघाली असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना महेश शिंदे म्हणाले, "गेली काही महिने सातत्याने शशिकांत शिंदे हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार अपात्र होणार, अपात्र होणार, अपात्र होणार असे बोलत होते. मात्र, असे बोलत असताना त्यांना स्वतःलाच अपात्रतेची नोटीस कधी आली हे कळले नसावे", असा जोरदार टोला लगावला.

जावळीत शशिकांत शिंदे यांचे मोठे स्वागत होत असताना कोरेगावातील त्यांचे कार्यकर्ते आपल्याकडे प्रवेश करत आहेत ? या प्रश्नावर आमदार म्हणाले, "शशिकांत शिंदे यांची जन्मभूमी ही जावळी आहे. तरी त्यांचा कोरेगावकरांनी स्वीकार करून निवडूनही दिले. जावळीत ते सहज गेले असतील अथवा त्यांना आता कोरेगावात काही अडचण वाटत असेल, तसेच स्वागत सर्वांचेच होत असते. मात्र, ते जावळीत जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा.!"

ते अमेरिकेतही निवडणूक लढवतील !

"वन नेशन वन इलेक्शन" असा निर्णय झाल्यास लवकरात लवकर निवडणुका होऊ शकतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार सांगतील त्या उमेदवाराच्या विरोधात मी दंड थोपटून निवडणूक लढवेन अगदी कोरेगावातही मी कमी पडणार नाही, असे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्याच्या प्रश्नावर महेश शिंदे म्हणाले, "त्यांच्याबरोबर आहे, त्यांना अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पाठवले तरी तेथे ते निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील. ते फार मोठे नेते आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा."

Edited by : Amol Jaybhaye

Mahesh Shinde News
Shivsena On Sharad Pawar: पडळकरांनंतर शिंदे गटाची पवारांवर खोचक टीका ; '' महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्यावर पूर्णपणे भरवसा...''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com