Vaijapur Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Vaijapur Market Committee News : आमदार बोरनारे यांच्याविरोधात भाजपची महाविकास आघाडीला साथ...

Shivsena : आमदार बोरनारे यांना बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिंदे गटाशी युती करू नका, असे फर्मान काॅंग्रेसच्या नेते, पदाधिकाऱ्यांना सोडले होते. परंतु स्थानिक पातळीवरचे राजकारण आणि परिस्थिती पाहता वैजापूरमध्ये मात्र हे फर्मान धुडकावण्यात आले आहे. शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या एकाधिकारशाहीला वैतागलेल्या तालुक्यातील बहुतांश भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी थेट महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे वैजापूर बाजार समिती निवडणुकीत दिनेश परदेशी वगळता (Ramesh Bornare) बोरनारे यांच्या बळीराजा पॅनलमध्ये (Bjp)भाजपचे तालुक्यातील इतर कुठलेही नेते सहभागी नाहीत. भाजप प्रदेश कार्यकारणीचे सदस्य एकनाथ जाधव, ज्ञानेश्वर जगताप, कचरु डिके, डाॅ. राजीव डोंगरे, कैलास पवार, प्रभाकर गुंजाळ हे स्थानिक पदाधिकारी थेट महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनलसोबत उघडपणे प्रचार करतांना दिसत आहेत.

वैजापूर बाजार समितीमध्ये आमदार बोरनारे विरुद्ध इतर सगळे राजकीय पक्ष असे चित्र सध्या आहे. १८ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत माघारीसाठी २० एप्रिल ही अंतिम मुदत असल्याने शेवटच्या दिवशी कोण माघार घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. वैजापूर बाजार समितीवर शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर.एम.वाणी, रामकृष्ण बाबा पाटील यांचे कायम वर्चस्व राहिले.

त्यानंतर काही काळ माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीची सत्ता राष्ट्रवादीकडे होती. मात्र आता भाऊसाहेब पाटील हे ठाकरे गटात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमदार रमेश बोरनारे यांच्याकडून तालुक्यातील स्थानिक भाजप नेत्यांना वाईट वागणूक दिली जायची, असे बोलले जाते.

त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत परदेशी वगळता भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बोरनारे यांच्या विरोधातील महाविकास आघाडीच्या पॅनलची साध देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. आघाडीने देखील भाजपला चार जागा देवू केल्याची चर्चा आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने वैजापूरमध्ये महाविकास आघाडीसोबत भाजप आल्याने याची राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आमदार बोरनारे यांना बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT