MLA Suresh Dhas On Shivraj Divate News Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas News : वाल्मीक कराडची बी गँग अ‍ॅक्टिव्हच! शिवराज दिवटेला मारहाण करणारे त्यांचेच लोक

Suresh Dhas claims a connection between Valmik Karad and the gang involved in the assault on Shivraj Divte. Political tensions rise. : वाल्मीक कराड जेलमध्ये असला तरी त्यांची बी गँग परळी आणि बीड जिल्ह्यात अजूनही अ‍ॅक्टिव्ह आहेच. महाकालचे भस्म आणि कपाळावर गंध लावणारे हे त्यांचेच पोरं आहेत.

Jagdish Pansare

Beed Political Crime : परळीत शुक्रवारी शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. अपहरण करून एका टेकडीवर नेत त्याला पट्टा, लोखंडी राॅड आणि काठीने मारहाण करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाची दहशत अद्याप कायम आहे. त्यात पुन्हा एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण आणि तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी दिलेली धमकी यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. आमदार सुरेश धस यांनी हे त्यांचेच लोक आहेत, असे म्हणत वाल्मीक कराड गँगकडे बोट दाखवले आहे.

वाल्मीक कराड (Walmik Karad) जेलमध्ये असला तरी त्यांची बी गँग परळी आणि बीड जिल्ह्यात अजूनही अ‍ॅक्टिव्ह आहेच. महाकालचे भस्म आणि कपाळावर गंध लावणारे हे त्यांचेच पोरं आहेत. शिवराज दिवटेला मारहाण करत संतोष देशमुख पार्ट टू करण्याचाच त्याचा प्रयत्न होता, तसं त्यांनी बोलूनही दाखवले आहे. पण दिवटे थोडक्यात वाचला, असे म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा परळीतील गँगवार आणि त्यांच्या आकांचा उल्लेख करत या प्रकरणातील आरोपी आणि वाल्मीक कराड गँगचे संबंध असल्याचे सूचित केले आहे.

शिवराज दिवटे याला अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न शुक्रवारी झाला. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. (Suresh Dhas) शिवाय दिवटे यांने आरोपींनी मारहाण करतांना तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी दिल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज बीड-परळी रोडवरील गोपीनाथ गड रस्त्यावर लिंबोटा ग्रामस्थांनी आरोपींवर मकोका लावण्याची मागणी करत रास्तारोको केला. तर मराठा संघटनांकडून बीड बंदची हाकही देण्यात आली.

दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना आरोपींचे वाल्मीक कराड व इतर नेत्यांसोबत फोटो आल्याचा दावा केला. हे त्यांचेच लोक आहेत, वाल्मीक कराडी बी गँग जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह आहे. शिवराज दिवटे याचा संतोष देशमुख होता होता राहिला, असे सांगत या महाकाल टोळीचा बंदोबस्त करावा लागेल, असेही धस म्हणाले.

काल धनंजय देशमुख शिवराज दिवटे याची अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. ही मारहाण आणि दिवटेला देण्यात आलेली धमकी हा गंभीर प्रकार आहे. ज्या आरोपींनी ही अमानुष मारहाण केली ते कोणाच्या जवळचे आहेत, हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे, असे सांगत धनंजय देशमुख यांनीही आरोपींचा वाल्मीक कराड गँगशी संबंध असल्याचे सूचक विधान केले होते. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी कोणत्या कोणत्या समाजाचे आहेत, हे सांगत याला जातीय रंग न देण्याचे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT