Beed Crime : शिवराज दिवटेला मारहाण करणं चांगलंच अंगलट येणार; अजितदादांच्या पोलिसांना सूचना आरोपींना थेट मकोका?

Ajit pawar On Shivraj Divate assault : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. या जिल्ह्यातील गुन्हेगारांनी कौर्याची परिसीमा गाठल्याचं उदाहरण देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये परळीतील शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
Ajit pawar On Beed Crime
Ajit pawar On Beed CrimeSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 18 May : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. या जिल्ह्यातील गुन्हेगारांनी कौर्याची परिसीमा गाठल्याचं उदाहरण देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

ज्यामध्ये परळीतील शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे बीडमधील गु्न्हेगारीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकत्व स्वीकारलं होतं.

Ajit pawar On Beed Crime
Beed Crime News : शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोळीचे वाल्मिक कराड कनेक्शन? संतोष देशमुख पार्ट टू करण्याची धमकी..

दादांच्या स्वभावानुसार ते बीडला सुतासारख सरळ करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सततच्या होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे बीडकरांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे अजित पवारांचा पोलिसांना आणि पोलिसांचा गुन्हेगारांना धाक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशातच परळीतील मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ पाहून अजित पवारांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क साधून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अजित पवार म्हणाले, मारहाणीचा व्हिडिओ बघवत नाही.

Ajit pawar On Beed Crime
Mahayuti Politics : फडणवीसांच्या स्वबळाच्या नाऱ्याला अजितदादांचाही होकार; महायुतीतील दोन मोठे पक्ष 'एकला चलो'च्या भूमिकेत ?

एखाद्या प्राण्यालाही कुणी एवढं मारणार नाही. मी पोलिस अधीक्षकांना फोन केला असून आरोपी जर गुंड प्रवृत्तीचे असतील तर त्यांच्यावर मकोका लावायला मागेपुढे बघू नका, लवकरात लवकर कठोर कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत, असं अजितदादांनी सांगितलं. त्यामुळे आता या आरोपींवर मकोका लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेमकं काय घडलं?

परळीत शुक्रवारी शिवराज दिवटे नावाच्या एका तरुणाचं दहा ते बारा जणांच्या टोळक्यान अपहरण केलं आणि त्याला एका टेकडीवर नेऊन पट्टा, लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण केली. आरोपींनी शिवराज दिवटेला मारहाण करताना व्हिडिओ बनवला असून तो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शिवाय या टोळक्याचा वाल्मिक कराडच्या गँगशी संबध असल्याच्या चर्चांनाही आता उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com