Walmik karad News sarkarnama
मराठवाडा

Walmik Karad News : संतोष देशमुख प्रकरणात माझा सहभाग नाही, मला आरोपमुक्त करा! वाल्मीक कराडचा अर्ज कायम

In the ongoing Santosh Deshmukh murder case, Valmik Karad filed a plea in the Beed Special Court claiming innocence and seeking acquittal. : वाल्मीक कराड, विष्णू चाटे याने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. आज यावर सुनावणी पार पडली.

Jagdish Pansare

Beed Special Court News : राज्यभरात खळबळ उडालेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याने आरोपमुक्त करण्यासाठी बीडच्या विशेष न्यायालयात केलेला अर्ज कायम ठेवला आहे. संतोष देशमुख प्रकरणात माझा सहभाग नाही, मला निर्दोष मुक्त करा, अशी मागणी कराड याने वकीला मार्फत दाखल केलेल्या अर्जात केली आहे.

तर या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याने मात्र आरोपमुक्त करण्यासाठी दाखल केलेला अर्ज आज मागे घेतला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 जून रोजी होणार आहे. संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मीक कराड, (Walmik Karad) विष्णू चाटेसह इतर आरोपी अटकेत असून या खटल्याची सध्या बीडच्या विशेष न्यायालयात सुनवाणी सुरू आहे.

वाल्मीक कराड, विष्णू चाटे याने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. (Beed News) आज यावर सुनावणी पार पडली. विष्णू चाटे याने डिस्चार्ज याचिका मागे घेतली. तर मुख्य आरोपी वाल्मीक कराडने मात्र आपला अर्ज मागे घेण्यास नकार दिला. संतोष देशमुख प्रकरणात आपला सहभाग नाही. आपल्याला या प्रकरणातून आरोपमुक्त करावे, अशी मागणी करणारा अर्ज त्याने कायम ठेवला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केल्यानंतर वाल्मीक कराडने सुरुवातीपासूनच आपण निर्दोष असल्याचा दावा करत याचिका दाखल केली होती. आपल्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी वाल्मीकने केली होती. या प्रकरणातील सहआरोपी विष्णू चाटे यानेही अशीच मागणी न्यायालयाकडे केली होती. या संदर्भात न्यायालयाकडे दाखल केलेला अर्ज आज चाटे याच्या वकीलांनी मागे घेतला. पुन्हा अर्ज दाखल करण्याचा हक्क राखून ठेवत हा अर्ज मागे घेण्यात आला आहे.

विशेष सरकारी वकील उज्वल निकम आजच्या सुनावणीला गैरहजर होते. दरम्यान, उज्वल निकम हे सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले.  तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपण 2 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना ज्या मागण्या दिल्या होत्या त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT