
Beed court news : राज्याच्या राजकारण खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी, ज्या न्यायाधीशांसमोर होती, ते रजेवर होते. याशिवाय सरकारी पक्षाचे विशेष वकील उज्ज्वल निकम, या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे देखील गैरहजर होते.
न्यायाधीश पाटोदकर रजेवर असल्याने या खटल्याची आजची सुनावणी विशेष न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर झाली. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी त्यांच्याकडून सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हजर होते. या खटल्याची सुनावणी पुढं 19 मे रोजी होणार आहे.
बीड (BEED) मस्साजोग इथला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 140 पेक्षा अधिक दिवस झाले. या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. पोलिस प्रशासनाने त्याला वाँटेड म्हणून जाहीर केले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार बीडच्या तुरुंगात आहे. या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष न्यायालयात सुरू आहे.
या खटल्याची आज चौथी सुनावणी विशेष न्यायालयासमोर (Court) आज होणार होती. विशेष न्यायाधीश पाटोदकर रजेवर होते. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीचे प्रकरण विशेष न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर देण्यात आले. मात्र न्यायाधीश शिंदे यांनी सुनावणीची थेट पुढची तारीख 19 मे रोजीची दिली.
न्यायाधीश रजेवर असतानाच, या खटल्याचे सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम देखील अनुपस्थित होते. उज्ज्व निकम यांनी त्यांच्या जागी सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हजर होते. आरोपी वाल्मिक कराड याचे वकील विकास खाडे देखील गैरहजर होते. आरोपी विष्णू चाटे यांचे वकील राहुल मुंडे देखील हजर होते. या खटल्याची पुढची सुनावणी 19 मे रोजी होणार आहे.
संतोष देशमुख यांचे अपहरण करून 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्येत बीडचे आमदार धनंजय देशमुख यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार निघाल्याने त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. या घटनेतील आणखी एक मुख्य सूत्रधार कृष्णा आंधळे हा अजूनही पसार आहे. कृष्णा आंधळे या प्रकरणात सापडल्यावर किंवा समोर आल्यावर घटनेचा आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.