Beed News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचे पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न सुरू होते. पण जागावाटपावरून चर्चा फिस्कटली. आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यातच आंबेडकरांना मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिला. कुणबी नोंदींबाबत पक्षाच्या राज्य कार्यकरिणीने घेतलेला निर्णयावरून राजीनामा देत असल्याचे अशोक हिंगे यांनी म्हटले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशोक हिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये(Vanchit Bahujan Aaghdi) प्रवेश केला करुन पक्षाकडून बीड विधानसभेची निवडणूक लढवली. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यामुळे त्यांच्या वर विभागीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी बीडमध्ये 'वंचित'च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु निवडणूक निकालानंतर ते पक्षापासून काहीसे दूर असल्याचे चित्र होते. त्यातच आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शेकडो मराठा तरुणांच्या आत्मबलिदानानंतर आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहेत.
लोकसभेनंतर झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बैठकीत वितरीत करण्यात आलेली सर्व कुणबी प्रमाणपत्र बोगस असून ती रद्द करण्यात यावीत, अशी असंविधानिक मागणी शासनाकडे करण्याचा राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतल्याने मला सामाजिक दृष्ट्या पक्षात काम करणे अडचणीचे ठरत आसल्याने मी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने मुस्लिम, ओबीसी तसेच इतर समाजातील अधिकाधिक उमेदवार देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला होत. काँग्रेसच्या चार ते पाच जागा वंचितमुळे पडल्याचे सांगितले जात होते. यंदा काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे वंचितच्या मतांची टक्केवारी घटली असली तरी त्यांच्या उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेत महायुतीचे नुकसान केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचाही अकोला मतदारसंघात पराभव झाला. मागील निवडणुकीत पक्षाला मिळालेला जनाधार यावेळी राहिला नाही, हे दिसून आले. आता विधानसभा निवडणुकीत ते कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. ओबीसी आरक्षण, मुस्लिम, आदिवासींचे प्रतिनिधित्व आदी मुद्दे ते प्रकर्षाने मांडत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.