MVA Meeting : महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला जाहीर, प्रत्येक पक्षाला 85 जागा...

Maha Vikas Aghadi Seat Sharing Formula : 270 जागांवर मित्रपक्षांमध्ये एकमत झाले असून वरील सर्व जागा मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांना सोडण्यात येणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maha Vikas Aghadi News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची 65 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत, नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला जाहीर केला.

तीनही पक्षांचे प्रत्येकी 85 जागांवर एकमत झाले आहे. 270 जागांवर मित्रपक्षांमध्ये एकमत झाले असून वरील सर्व जागा मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांना सोडण्यात येणार आहेत. सध्या प्रत्येक पक्षाच्या वाट्याला 85 जागा आल्या आहेत. राहिलेल्या जागांवर लवकरच तोडगा काढण्यात येणार आहे.

शिवसेनेने (यूबीटी) यादी जाहीर केली असली तरी ती अंतिम नाही. त्यामध्ये काही दुरुस्तांची आवश्यकता असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या यादीतील काही दुरुस्ती आहेत. कशा प्रकारे झाले काय झालं ते आम्ही पाहू. प्रशासकीय चूक कशी झाली ते आम्ही पाहून आमचे अनिल देसाई आहेत ते पाहताता, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Shivsena (UBT) Candidate List : तानाजी सावंत यांना ठाकरेंचा `हा` शिलेदार भिडणार! मराठवाड्यात बारा उमेदवार जाहीर

आमच्या यादीत काही जागा आहेत त्यावर शेकापा दावा आहे काही जागांवर काँग्रेसचा दावा आहे त्यामुळे आम्ही चर्चा करून मार्ग काढू. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई उमेदवार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत वरळीतून आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, चाळीसगावमधून उन्मेष पाटील, बाळापूरमधून नितीन देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर ठाण्यातून राजन विचारे यांना तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखडीमधून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
MVA Politics Video : महाविकास आघाडीत ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, फाॅर्म्युला ठरला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

 MVA
Congress leader Harshvardhan Sapkal extends support to Uddhav Thackeray for Legislative Council election.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Uddhav thackeray, Harshvardhan Sapkal, sharad pawar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com