Nanded : लोकसभेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील हे गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय समीकरणे बदलत आहेत.या महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय पटलावर वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वाचा भाग झाली आहे.वंचित बहुजन आघाडीने गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडविले होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत फटका बसणार नाही यासाठी वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
वंचितमुळे ज्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan ) यांचा समावेश होता. लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेत अशोक चव्हाण निवडून आले होते. पण 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा दिल्लीत जाण्याची संधी 'वंचित'मुळे (vanchit) हुकली होती. वंचितचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख 60 हजार मते घेतली होती. तर, अशोक चव्हाणांचा 41 हजारांनी पराभव झाला. त्यांच्या विजयाचे गणित वंचित मुळे बिघडले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा, यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. गेल्या लोकसभा निवडणुकी वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला होता. काही मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासाठी विचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला.त्यामुळे वंचितमुळे झालेला पराभव अशोक चव्हाण यांना विसरावा लागणार आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना ठाकरे गट व वंचित एकत्र आले आहेत. पण वंचित बहुजन आघाडी ही इंडीया आघाडीचा घटक पक्ष झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. काँग्रेसला नांदेडची जागा पुन्हा जिंकायची असेल तर आपली पारंपरिक मतं कायम ठेवण्यासाठी वंचितची गरज पडणार आहे.असे असले तरी अद्याप वंचित इंडिया आघाडीच्या बाहेर आहे.अशोक चव्हाणांची वंचितला सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहेत. त्यांच्या प्रयत्नांना आद्यप यश आले नाही.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.