Chhatrapati Sambhajinagar News, 08 Jan : 'देशाचं राष्ट्रगीत जन गण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे'; असं वक्तव्य मंहत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. रामगिरी महाराज हे सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मुस्लिम (Muslim) समाज त्यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाला होता. अशातच आता त्यांनी राष्ट्रगीता संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी रामगिरी महाराज आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
ते म्हणाले, "प्रत्येक चित्रपटाच्या सुरूवातीपूर्वी राष्ट्रगीत (National anthem) वाजवलं जातं, तसं इथेही वाजवलं गेलं. मात्र, हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली कोलकाता येथे जॉर्ज पंचम यांच्यासमोर गायल आहे. ते राष्ट्राला संबोधून गायलं नव्हतं तर ते जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी गायलं होतं. त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं आपंलं राष्ट्रगीत आहे."
तसंच ते पुढे म्हणाले, कदाचित माझ्या शब्दावर लोक आक्षेप घेतील. मात्र, जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी टागोर (Rabindranath Tagore) यांनी हे गीत गायलं आहे. या गीतातून त्यांनी पंचम यांना तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात, असं म्हटलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं कार्य आहे. पण सध्या ज्याप्रमाणे शिक्षण संस्था चावणाऱ्या लोकांना राजकीय लोकांशी समतोल राखावा लागतो.
ब्रिटीश काळातही शिक्षण संस्था चालवणाऱ्यांना ब्रिटीशांना धरून चालावं लागत होतं, म्हणून टागोर ब्रिटीशांची स्तुती केली आणि त्यामुळेच त्यांना नोबल पुरस्कार मिळाला, असंही रामगिरी महाराज म्हणाले. दरम्यान, त्यांनी आपणाला चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचंही वक्तव्य यावेळी केलं.
ते म्हणाले, "आतापर्यंत आपल्याला चुकीचं शिक्षण दिलं जात आहे. आपण रामकृष्णाचे वंशज आहोत. मात्र, इतिहासात आमचे पूर्वज आर्य होते आणि ते पाश्चिमात्य देशांतून आले होते, असं सांगण्यात आलं. पूर्वी साधू-संतांना चित्रपटांमध्ये महत्त्व दिलं जात नव्हतं पण आज महत्त्व दिलं जातं. यापूर्वी सनातन धर्माची आ चित्रपटांतून बदनामी होत होती.
बाहेरून आलेल्या बाबर आणि गझनीने देशात खूप अत्याचार केले. अनेक हिंदूंची हत्या केली. औरंगजेबाने या संभाजीनगर शहरात खूप अत्याचार केले, मंदिरं पाडली आणि मशिदी बांधल्या. पण आम्हाला शाळेत शिकवलं होतं की, कोणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करावा पण तसं न करता कुणी एक मारली तर दोन मारा."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.