Vasant Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Vasant Chavan News: नांदेडमधून सर्वात मोठी बातमी! खासदार वसंत चव्हाणांची प्रकृती बिघडली; 'एअर अ‍ॅम्ब्युलन्स'ने हैदराबादला हलवणार

Congress MP Vasant Chavan News : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांना नांदेडच्या लाईफकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (ता.13) दाखल करण्यात आले.

Deepak Kulkarni

Nanded News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण हे भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करत 'जायंट किलर' ठरले होते. चव्हाण यांचा विजय राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. पण आता त्यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर येत आहे.

नांदेडचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांना नांदेडच्या लाईफकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (ता.13) दाखल करण्यात आले.श्वास घेण्यास अडचण येत असून अचानक बीपी लो झाल्याने त्यांना खासदार वसंत चव्हाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मात्र, आता त्यांना पुढील उपचारासाठी एअर ॲब्युलन्सद्वारे हैद्राबाद येथे हलवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकेकाळी काँग्रेस पक्षापेक्षा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला म्हणून नांदेड ओळखले जात होते.पण अंतर्गत गटबाजीला कंटाळून काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल झाले. त्यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता.

नांदेडमधून काँग्रेस (Congress) पक्ष संपणार असंही बोलले जाऊ लागले. पण वसंतराव चव्हाण यांनी अशोक चव्हाणांच्या साम्राज्यालाच धक्का देत विजय खेचून आणला. त्यामुळे त्यांचं काँग्रेससह राज्याच्या राजकारणात चांगलेच वजन वाढले आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांना मंगळवारी दुपारी अचानक श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. ही बाब लक्षात येताच कुटुंबातील लोकांनी त्यांना नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर कृष्णा पाटील यांनी दिली आहे.

पण आता खासदार वसंत चव्हाण यांना पुढील उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सद्वारे हैद्राबाद येथील किम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समजताच त्यांच्या समर्थकांसह नांदेडकरांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT