Raju Navghare, jayparkash Dandegavkar  Sarkarnama
मराठवाडा

NCP News : वसमतच्या आजी-माजी आमदारातील वाद विकोपाला; निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांवर टीका

सरकारनामा ब्युरो

पंजाब नवघरे

Hingoli News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने वसमत मतदारसंघातील आमदार राजू नवघरे व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दोघेही मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

विद्यमान आमदारांवर विश्वास ठेवून मी पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढवण्यासाठी थांबलो होतो. परंतु, गेल्या सहा महिन्यापासून मतदारसंघातील नागरिकांच्या आमदारांविषयी असंख्य तक्रारी येत आहेत. ते परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने आपण आग्रहास्तव मैदानात उतरलो, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (Jayprkash Dandegavkar) यांनी अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांच्यावर निशाणा साधला. (NCP news)

या निमित्ताने वसमतच्या दोन आजी-माजी आमदारातील वाद विकोपाला गेला आहे. वसमत विधानसभा मतदारसंघात जयप्रकाश दांडेगावकर यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2004 ते 2009 या दरम्यान ते सहकार राज्यमंत्री देखील राहिले आहेत. साखर कारखानदारीच्या यशस्वी कामगिरीमुळे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात.

2019 च्या निवडणुकीत दांडेगावकर हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असताना आमदार राजू नवघरे यांनी थेट अजित पवारांच्या माध्यमातून उमेदवारी मिळवली, त्यावेळी शरद पवारांनी दांडेगावकर यांना शांत रहा, पुढे बघू असा सल्ला दिला होता. त्यानुसार ज्येष्ठत्वाची भूमिका निभावत दांडेगावकर यांनी नवघरे यांच्या विजयासाठी पुढाकार घेतला

चार वर्षे या दोन नेत्यात सर्व काही गुरु शिष्याप्रमाणे नाते होते, परंतु राष्ट्रवादीत फूट पडली आणि हे दोन नेते वेगवेगळे झाले. अधूनमधून या दोन नेत्यातील वाद धुमसत आहे. आगामी निवडणुकीत नवघरे अजित पवार गटाचे उमेदवार असणार आहेत तर 2019 मधील निवडणुकीत थांबून उमेदवारीवर पाणी सोडणारे दांडेगावकर आता शरद पवार गटाकडून मैदानात उतरले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने बैठका घेऊन नवघरे यांच्यावर टीका करत आहेत.

वाई येथे झालेल्या आदिवासी संवाद मेळाव्यात त्यांनी नाव न घेता नवघरे यांच्यावर टीका केली. विद्यमान आमदारांच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत, जनता त्यांच्यावर नाराज आहे मला वाटलं होतं ते मतदारसंघ व्यवस्थित हाताळतील परंतु ते परीक्षेत नापास झाले, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. आता नवघरे काय प्रत्युत्तर देतात याकडे वसमत मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT