Hasan Mushrif : आधी रक्तपाताची भाषा आता हसन मुश्रीफांचा शब्द, पण...

Hasan Mushrif Vs Prakash Awade : आमदार प्रकाश आवाडे आणि पालकमंत्री मुश्रीफ यांच्यात सुळकुडे पाणी प्रश्नावरून चांगलीच जुंपली आहे. मात्र, आता मुश्रीफांनी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आहे.
hasan mushrif.jpg
hasan mushrif.jpgsarkarnama
Published on
Updated on

इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सुळकुड पाणी योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र, सरकारी स्तरावर त्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत. या मुद्द्यावरून इचलकरंजी विधानसभा मतदरसंघात सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपण्याची चिन्हे आहेत.

त्यातच गुरूवारी सुळकुड पाणी कृती समितीच्यावतीने इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पालकमंत्री मुश्रीफ ( Hasan Mushrif ) यांनी इचलकरंजीवासियांना शब्द दिला आहे.

"इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुळकुड योजनेबाबत योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल," अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. "याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या अहवालातील बाबींची अंमलबजावणी केली जाईल," असे आश्वासन पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.

आठ ते नऊ महिन्यांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुळकुड पाणी प्रश्नावरून रक्तपाताची भाषा केली होती. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुळकुड योजना मंजूर आहे. मात्र, सुळकुड बंधाऱ्यावरून पाणी घेण्यास कागल विधानसभा मतदारसंघातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजी आणि कागल विधानसभा मतदारसंघात हाच प्रचाराचा फंडा वापरला जाण्याची शक्यता आहे.

hasan mushrif.jpg
Sanjay Ghatge: ठाकरे गटाच्या माजी आमदाराला मिळाली परतफेड; पाठिंबा दिल्याने मुश्रीफांकडून मोठं 'गिफ्ट'

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सुळकुड पाणी योजनेच्या समर्थनार्थ अनेक जण उतरल्याचे दिसतात. आमदार प्रकाश आवाडे आणि पालकमंत्री मुश्रीफ यांची मागील महिन्यांपासून याच मुद्द्यावरून चांगलीच जुंपली आहे. अशातच गुरूवारी पाणी योजनेच्या कृती समितीने मुश्रीफ यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केल्यानंतर पुन्हा एकदा या प्रश्नाला धार येण्याची शक्यता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com