manoj jarange patil shantata rally at beed Sarkarnama
मराठवाडा

Video Manoj Jarange Patil Shantata Rally : 'हुजूर... मराठे आ गये!' मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीच्या निमित्ताने अख्खे बीड शहर भगवे

Manoj Jarange Patil Shantata Rally : या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग आणि उत्साह देखील लक्षवेधी आहे. 'हुजूर...मराठे आ गये!' अशा आशयाचे फलक हाती घेऊन महिलाही सहभागी झाल्या आहेत.

Dattatrya Deshmukh

Beed Maratha Savand Morcha : सकल मराठा समाजाच्या वतीनं आज 11 जुलै बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात 'शांतता रॅली'चं आयोजन करण्यात आलंय. बघता बघता बीड शहरात प्रचंड गर्दी झाली आहे. सर्वच रस्ते गर्दीने तुडूंब भरले आहेत. काही वेळातच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन फेरीची सुरुवात होणार आहे. या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग आणि उत्साह देखील लक्षवेधी आहे. 'हुजूर...मराठे आ गये!' अशा आशयाचे फलक हाती घेऊन महिलाही सहभागी झाल्या आहेत.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मागच्या महिन्यात मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा करुन एक महिन्याचा वेळ मागीतला. 13 जुलै रोजी ही मुदत संपत आहे.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जनजागृती व शांतता रॅली काढत आहेत. आज बीडला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून फेरीची सुरुवात होऊन माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात या फेरीचा समारोप होणार आहे. या रॅलीसाठी मराठा बांधवाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून बीड (Beed) शहरात मोठमोठे बॅनर, भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातच मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, अद्याप फेरीची सुरुवात झाली नसली तरी बीडमध्ये येणारे जालना रोड, बार्शी रोड, नगर रोडसह शहरातील अंतर्गत रस्ते मराठा बांधवांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. 'हुजुर... मराठे आ गये', 'झोपी गेलेल्या सरकारला जागे व्हावे लागेल', 'मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल', अशा विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन महिलाही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. सर्वत्र भगवे झेंडे, गळ्यात भगवे उपरणे घालून मराठा समाज बीडच्या रस्त्यावर उतरला आहे. महिलांची गर्दी आणि उत्साह देखील लक्षवेधी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT