Manoj Jarange : आता मुंबईला गेलो तर आरक्षण घेऊनच येईल; जरांगेंचा निर्धार

Maratha Reservation News : छगन भुजबळांना दोन समाजात दंगल घडवून आणायची आहे, मात्र आपण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असे जरांगे लातूरमधील सभेत म्हणाले.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

सुशांत सांगवे

Latur Political News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगेसोयऱ्यांची अमंलबजावणी करावी, असा आग्रह आंदोलक मनोज जरांगेंनी धरला आहे. ती मागणी पूर्ण झाली नाही तर मराठा समाज मुंबईला धडकणार. आता मुंबईला गेलो तर आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरणार नाही, असा निर्धार करत जारागेंनी सरकार इशाराही दिला. ते लातूरमधील शांतता रॅलीत बोलत होते.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा आणि ओबीसीत दंगल घडवण्याचा डाव होता, असा आरोप करीत तो डाव मराठा समाजाने हाणून पाडला, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी लातूरच्या मराठा आरक्षण शांतता संवाद रॅलीत पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्ला चढवला.

आपल्याला शांततेची युद्ध लढायची आहे मराठा-ओबीसी वाद होणार नाही याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवू, असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.

मराठ्यांच्या विरोधात छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र आणले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आहे. मंत्री गिरीश महाजन हे सगेसोयऱ्याचे प्रमाणपत्र टिकणार नाही, असे सांगत आहेत. असे असेल तर मग अंतरवाली सराटीत आरक्षणाचे अभ्यासक, आयोगाचे अध्यक्ष, अधिकारी कशाला आणले होते? आम्ही तुम्हाला येडे वाटलो का? तुम्ही पाचर मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर मराठा समाजाने तुम्हाला खुटा कसा असतो ते दाखवले आहे.

Manoj Jarange
Devendra Fadnavis : महाराष्ट्र पेटवून पोळी भाजण्याचा 'त्यांचा' डाव; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?

खोटी माहिती देवून समाजात गैरसमज पसरवू नका. मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांचा आम्ही कार्यक्रम करू. शासनाने दिलेले दहा टक्के आरक्षण टिकणारे नाही. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासाठी लढा सुरू आहे. जात संपली तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. त्यामुळे येथे मराठ्यांचीच चलती असली पाहिजे, असे जरांगे पाटील Manoj Jarange म्हणाले.

मला उघडे पाडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. पण याला मी घाबरणार नाही, मला फक्त तुमची साथ हवी आहे, गद्दारी करणार नाही. आपल्या विरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना एकत्र केले आहे. मराठ्यांचे नेते एकत्र येणार आहेत की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याला शांततेने युद्ध जिंकायचे आहे. मराठा- ओबीसी वाद होणार नाही या करीता दक्ष रहावे.

नेत्यांनो कोणत्याही पक्षात असाल जातीच्या बाजूने उभे रहा, असे आवाहन करतानाच आमचे शांततेत आंदोलन सुरू असल्याचे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटीसह इतर ठिकाणी ओबीसी समाजाची रॅली काढायची. त्यात दगडफेक करायला लावायची व ती दगडफेक मराठा समाजाने केली, असे दाखवायचे यातून मराठा Maratha व ओबीसी समाजात दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांचा होता. हा प्रयत्न मराठा समाजाने हाणून पाडला आहे. भुजबळांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे स्वप्न साकार होणार नाही. त्यांना पाडल्याशिवाय समाजही गप्प बसणार नाही, असा गर्भित इशाराही जरांगेंनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange
Devendra Fadnavis News: विधान परिषद निवडणुका,पावसाळी अधिवेशनाच्या गडबडीत फडणवीस अचानक राज्यपालांच्या भेटीला; 'हे' आहे मोठंं कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com