Mla Bhai Jagtap-Nilam Gorhe News Sarkarnama
मराठवाडा

Vidhan Parisad : काॅंग्रेसला कमी वेळ देता भाई जगतापांचा आरोप, सभापतींनी सभागृह केले तहकूब..

Congress : भाई जगताप यांनी आम्हाला कितीवेळ बोलायला देणार हे विचारा असे वंजारी यांना सुचवले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai : अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी काॅंग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी हे सभागृहात उभे राहिले. तेव्हा इतर सदस्यांना २० मिनिटे बोलण्यासाठी दिली जातात, आम्हाला १० मिनिटेच का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला. यावर काॅंग्रेसचेच आमदार भाई जगताप (Bhia Jagtap) हे देखील उभे राहिले. त्यांनीही हाच मुद्दा उपस्थितीत करत सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप केला. यावर संतपालेल्या सभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

भाई जगताप यांचे आरोप खोटे आहेत, असे म्हणत त्या निघून गेल्या. (Congress) अर्थ संकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget) आज शेवटचा दिवस असल्याने अंतिम आठवडा प्रस्तावर विरोधकांना बोलू द्यावे, अशी भूमिका भाई जगातप यांनी मांडली. शिवाय सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रस्तावावर एकच उत्तर देणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

यावर भाई जगताप सभागृहात नसतांना या संदर्भात चर्चा झाली होती, सगळ्या सदस्य आणि गटनेत्यांनी मिळून अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकच उत्तर देणार असे ठरले होते, याची आठवण सभापतींनी जगताप यांना करून दिली. दरम्यान, लक्षवेधी आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर भाजपचे प्रसाद लाड बोलल्यानंतर सभापतींनी काॅंग्रेसच्या अभिीजीत वंजारी यांना बोलण्याची संधी दिली. ते बोलणार तेवढ्यात भाई जगताप यांनी आम्हाला कितीवेळ बोलायला देणार हे विचारा असे वंजारी यांना सुचवले.

त्यानूसार वंजारी यांनी सभापतींना आम्हाला किती वेळ आहे. यावर मी दहा मिनिटांची परवानगी दिली आहे, पण अनेक सदस्यांची नावे असल्यामुळे तुम्ही ८ मिनिटात संपवले तर बरे होईल असे त्या म्हणाल्या. यावर इतर सदस्यांना २० मिनिटे आणि आम्हाला ८ का? असा सवाल वंजारी यांनी सभापतींना केला. तेव्हा जगताप मध्येच उठले आणि त्यांनी भेदभाव होत असल्याचा आरोप केला. हा आरोप फेटाळत सभापतींनी सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT