Vijay Wadettiwar News Sarkarnama
मराठवाडा

Vijay Wadettiwar News : तर देशाचे दोन तुकडे झाले असते ; वडेट्टीवार असं का म्हणाले ?

Congress News : मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे

Prasad Shivaji Joshi

Marathwada Congress News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. (Vijay Wadettiwar News) काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी रविवार, दि. १९ रोजी परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानात भगवान गौतम बौद्ध यांच्या मूर्ती वाटप कार्यक्रम घेतला.

यावेळी माध्यमांशी बोलतांना वडेट्टीवार यांनी बाबासाहेबांनी शांतीचे प्रतिक म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे सांगितले. (Parbhani) सध्या देशात धर्मा धर्मात आणि जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे. जगातले सर्वात मोठे धर्मांतर नागपूरात झाले होते. (Congress) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यावेळी त्यांना अनेक धर्माकडून निमंत्रण होते, मात्र त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

जर कदाचित त्यांनी बौद्ध धर्माऐवजी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते. म्हणून शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची संपूर्ण विश्वाला गरज असल्याचे वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून उपमुख्यमंत्रीपद दिले. हे केवळ भारतातच घडू शकते, असा टोलाही वड्डेटीवार यांनी लगावला.

मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरील धार्मिक कार्यक्रम आटोपून वडेट्टीवार यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. यावेळी रेल्वे स्टेशनसमोर पाच ते सहा मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले.

मराठा आरक्षणाला विरोध करत विजय वडेट्टीवार हे आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहेत. दोन दिवसांपुर्वी अंबड तालुक्यात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातही त्यांनी जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर परभणीत त्यांना मराठा आंदोलकांचा विरोध झाला. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT