Mumbai News : जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसींच्या मेळाव्यात आरपारच्या लढाईची भाषा करणारे ओबीसी नेते आता एकमेकांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचे माध्यमांसमोर येऊन सांगू लागले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला आपले समर्थन नाही, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये फाटाफूट होते की काय, अशी चर्चा रंगली आहे. (I do not support Chhagan Bhujbal's stand : Vijay Wadettiwar)
माझं कुणाच्याही भूमिकेला समर्थन नाही. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला मी कसं समर्थन देणार आहे. त्यांची भूमिका वेगळी आहे, त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचे विचार वेगळे आहेत. माझी स्वतःची आणि माझ्या पक्षाची भूमिका घेऊनच मी पुढे जाणार आहे. मी अनेक वर्षांपासून लढणारा कार्यकर्ता आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी मराठा समाजाच्या विरोधात नाही, त्यामुळे मला ट्रोल करायचे काही कारण नाही. मला मराठा समाजाचं अहित करायचं नाही. त्या समाजातील तरुण मुलांचं नुकसान आम्हालाही करायचं नाही. पण, ओबीसी समाजातील गरिबांच्या हक्काचं संरक्षण करणे, हे आमचे कर्तव्य आहे. त्यातून मी माझी भूमिका मांडली आहे. पण, इतरांना दुःख होऊ नये. इतरांच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत. ही आमची भूमिका असली पाहिजे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी वेळ दिली आहे, त्या वेळेच्या मुदतीमध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं सरकारने मान्य करावं, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे.
दरम्यान, अंबड येथील मेळाव्यात ओबीसी नेत्यांनी आक्रमक भाषणे केली होती. त्यातही छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांची भाषणे गाजली होती. मात्र, आक्रमक भाषणावरून भुजबळ यांच्यावर मराठा समाजातून टीका होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तर भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडही भुजबळांंच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.