Vijay Wadettiwar Sarkarnama
मराठवाडा

Vijay Wadettiwar : 'लोकसभेत मतांची कडकी, म्हणून आठवली बहीण लाडकी!'; वडेट्टीवारांचा घणाघात

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 'मिशन 45' म्हणणाऱ्या महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या. यानंतर सत्ताधारी महायुतीने अंतरिम अर्थसंकल्पात अनेक योजना सुरू केल्याचे बोलले जाते. हाच धागा पकडून लोकसभेत मतांची कडकी आली म्हणून महायुती सरकारला लाडकी बहीण आठवल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

आता तुम्हाला दीड हजार देतील, मात्र तीन हजाराने खिसा कापतील. त्यामुळे भगिनींनो सतर्क रहा, असे आवाहन करत वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.

लातूर Latur येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे मराठवाडा विभागातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, मराठवाडा आणि काँग्रेसचे भावनिक नाते आहे. मराठवाडामधून तीन मुख्यमंत्री, दोन गृहमंत्री काँग्रेसच्या नेतृत्वाने दिले आहेत. मराठवाड्याने 100 टक्के निकाल लोकसभेत दिला. तीन खासदार पहिल्यांदा निवडून दिल्याबद्दल मराठवाड्यातील जनतेचे वडेट्टीवार यांनी आभारही मानले.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या न्यायाचे हक्काचे आरक्षण मिळणार आहे. लोकसभेत आपले खासदार जोमाने लढत आहेत. त्यामुळे 56 इंच छाती म्हणणाऱ्यांची छाती आता 36 इंच झाली आहे, असे निशाणाही वडेट्टीवारांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर साधला.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांना सत्तेत बसवले आहे. 70 हजार कोटी खाल्ले आणि सरदार विचारतात बेटा किताना खाया. या सरकारला घालवण्यासाठी ताकदीने एकत्र या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार. काँग्रेसचा तिरंगा विधानसभेवर फडकणार असाही विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

संविधान वाचवण्यासाठी लढाई लढली आता महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचविण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? गुजरातला गहाण नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा शब्दात वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत वडेट्टीवार म्हणाले, साहेबांबरोबर काम केले आहे त्यांची आठवण येते. 2004 मध्ये ओबीसींना शिष्यवृत्ती देण्याचे काम आदरणीय साहेबांनी केले होते. सध्या मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात असले तरी दोन्ही समाजाला काँग्रेसने नेहमीच न्याय दिला आहे.

लातूर येथे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे Shivajirao Kalge, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालना येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील Satej Patil, दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधीकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT